पुण्यामध्ये राज्य कर निरीक्षक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
पुणे येथील जी.एस.टी. कार्यालयातील राज्य कर निरीक्षक तुषारकुमार माळी (वय ३३) यांना ५,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडले. तक्रारदार वकिली व्यवसायात असून, एका व्यापारी अशिलाच्या जी.एस.टी. नंबर पुनर्जिवीत करण्यासाठी त्यांनी कार्यालयात तक्रार केली होती. तक्रारीनुसार, तुषारकुमार माळी यांनी कामासाठी ५,००० रुपयांची मागणी केली. पंचासमक्ष पडताळणीनंतर आज येरवडा कार्यालयात लाच स्वीकारताना माळी…