मेळघाटातील कुपोषित बालकांच्या आयुष्याला सोनेरी झळाळी देणारा अवलिया म्हणजे भगवान कोपरकर – व्यवस्थापक सुरेश साळुंखे

Swarajyatimesnews

दिनांक २५ जानेवारी
समाजसेवक शांतीलाल मुथा व भारतीय जैन संघटनेचे सामाजिक कार्य समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकांसाठी व्यापक व सर्वसमावेशक समाजसेवेचे काम करत असते असाच एक प्रकल्प भूकंप ग्रस्त मुलांच्या व मेळघाटातील कुपोषित, दुर्लक्षित मुलांच्यासाठी राबवण्यात आला होता. यावेळी संस्थेतील कर्मचारी भगवान कोपरकर यांनी मेळघाटात अत्यंत दुर्गम आदिवासी पाड्यांवर जात येथील मुलांना शिक्षणासाठी बी जे एस प्रकल्पात आणले. शांतीलाल मुथा यांच्या समाजसेवेच्या व सामाजिक कृतज्ञतेच्या, गोरगरिबांच्या मुलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक कर्मचारी,सहकारी व पाईक म्हणजे नावाला साजेसे काम करणारे अवलिया म्हणजे भगवान कोपरकर असे मत बी जे एस संघटनेचे प्रकल्प व्यवस्थापन सुरेश साळुंखे यांनी निरोप समारंभात व्यक्त केले.


याप्रसंगी प्राचार्य डॉ संजय गायकवाड यांनी भारतीय जैन संघटनेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात स्वतः ला झोकून देत देहभान विसरून प्रामाणिकपणे काम करणारा मोकळ्या मनाचा व माणुसकी जपत इतरांच्या कल्याणासाठी राबणारा हक्काचा माणूस म्हणजे भगवान कोपरकर असल्याचे सांगितले.


यावेळी अशोक पवार व डॉ. जोतिराम मोरे सर यांनी मेळघाट येथे बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते त्यावेळी शांतीलाल मुथा साहेबांच्या सामाजिक संवेदनशीलतेने व संस्थेच्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्त मेळघाटातील कुपोषित व वंचित कुटुंबातील मुलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भगवान कोपरकर यांनी दुर्गम भागात अनेक आव्हानं स्वीकारत त्यांना दुर्गम पाड्यांमधून शोधून त्यांना बी जे एस संघटनेच्या छाया छत्राखाली आणत त्यांच्या आयुष्याला नवीन झळाळी देण्याचे व पुण्याचे काम भगवान कोपरकर सरांनी केले असल्याचे सांगत जिवंत हृदयाचा निष्कपट मित्र असे म्हणत कोपरकर यांच्या कार्याचा गौरव केला.
गिरीशकुमार शहा यांनी भगवान कोपरकर सर म्हणजे कॉलेज मधील प्रामाणिक काम करणारे माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व असून सर्वांशी प्रेमाने हसत खेळत राहणारे व माणुसकीने हृदय जिंकणारा आदर्श सहकारी असल्याचे प्रतिपादन केले.


यावेळी चेअरमन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सहकाऱ्याच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे व त्यांच्या आर्थिक व कौटुंबिक अडचणीत उभे राहणारे निस्वार्थ मोठे बंधू असणारे भगवान कोपरकर म्हणजे कर्मचाऱ्यांत देव माणूस असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी डॉ मनीषा बोरा, डॉ सिद्धेश्वर गायकवाड,पांडुरंग पवार, डॉ यादव यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना भगवान कोपरकर यांनी माझ्या आयुष्याचे शांतीलाल मुथा व बी जे एस संघटनेनं सोन केले असून कठीण प्रसंगात सर्वजण कुटुंबासारखे मागे उभे राहिले, आयुष्यात सेवा धर्म व माणुसकी जपत समाजाचे ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असून संस्थेने भरभरून प्रेम दिले अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे भाग्य लाभले हेच मूथे भाग्य असल्याचे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ भूषण फडतरे यांनी केले तर आभार प्राचार्य संतोष भंडारी यांनी मानले. याप्रसंगी प्रा. सुभाष शिंदे, डॉ माधुरी देशमुख, कार्यालय अधीक्षक शाम पाटील तसेच संस्थेचे विविध विभाग प्रमुख, सिनियर व ज्युनिअर कॉलेज,हायस्कूल प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आप्तस्वकीय मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!