दिनांक २ फेब्रुवारी -: वढू बुद्रुक (ता.शिरूर) माहेर संस्थेचा २८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात परदेशी पाहुण्यांनी आणि माहेरच्या मुलांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. यानंतर मुलांनी आपले विविध नृत्यप्रकार सादर करत उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते वृक्षांना पाणी घालून करण्यात आली. प्रमुख पाहुण्या मनीषा कटके व इतर मान्यवरांचा सन्मान सिस्टर लुसी यांच्या हस्ते करण्यात आला. मनीषा ज्ञानेश्वर कटके यांनी आपल्या मनोगतातून माहेरच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
आमदार बापूसाहेब पठारे यांनी माहेरला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत माहेरचे कार्य पोहोचवून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.”
कार्यक्रमात माहेरच्या कर्मचाऱ्यांचा, गृहमातांचा आणि रथसारथींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे, उद्योजक प्रकाश धोका, अजय राऊत, अर्चना राऊत (बालकल्याण समिती क्रमांक १ सदस्य), हेलन दीदी, निकोला दीदी, शशिकांत गोरे, निकोला दीदी,शशिकांत गोरे,पत्रकार सोमनाथ आव्हाळे,पत्रकार जितेंद्र आव्हाळे व माहेर कर्मचारी तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.