गजानन पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा स्विकारला कार्यभार

Swarajyatimesnews

पुणे – पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला आहे. संतोष पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  गजानन पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव व सचिव म्हणून काम केले आहे. पुणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास असल्याने या अनुभवाचा फायदा त्यांना सीईओ म्हणून काम करताना होणार आहे.  

त्यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, तसेच एमआयडीसीच्या मार्केटिंग विभागाचे सरव्यवस्थापक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. चाकण एमआयडीसीतील प्रश्न सोडवणे, खेड एसईझेडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी योग्य मोबदला मिळवून देणे, आळंदीच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी आणि शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिले आहे.  

गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर लोकाभिमुख काम करण्याचा आपला मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. “लोकांच्या समस्या सोडवून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे त्यांनी नमूद केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!