
Category: Uncategorized

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!
दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या. पारदर्शकतेने पार पडली सोडत…

धक्कादायक! पुण्यात आई वडिलांनी अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीला ३.५ लाखांना विकले
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी एका आई-वडिलांनी आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या मुलीची ३.५ लाख रुपयांना विक्री केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे मीनल ओंकार सपकाळ (२९) आणि ओंकार औदुंबर सपकाळ (२९) अशी असून ते दोघेही बिबवेवाडीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

“पप्पा, मला अॅडमिशन घेऊन द्या ना, पैशांअभावी बारावीला प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
वर्धा: “पप्पा, मला अॅडमिशन घेऊन द्या ना,” अशी विनंती करूनही आर्थिक अडचणीमुळे बारावीला प्रवेश न मिळाल्याने एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणसावळी गावात घडली आहे. सोनिया (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात…

अल्लाने मोदींमार्फत सगळं दिलंय, मला कुणाची मदत नको! अपंग मुस्लिम व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका अपंग मुस्लिम व्यक्तीचा स्वाभिमानाने भारावलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. आपली सायकल गाडी चालवून स्वतःच्या मेहनतीवर जगणाऱ्या या व्यक्तीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या अभिनेत्री हेमा शर्माला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याचे शब्द होते, “मी स्वतःच्या मेहनतीने खातो, कुणाचं घेत नाहीत… मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा…

मिरजमध्ये लग्नाच्या वादामुळे बाप-लेकाची आत्महत्या, एकाच वेळी निघणार अंत्ययात्रा
मिरजमध्ये लग्नाच्या वादामु, मिरज: ज्या घरात महिन्याभरापूर्वी सनई-चौघडे वाजत होते, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिरज तालुक्यातील सोनी येथे लग्नाच्या वादामुळे गणेश हिंदुराव कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे (वय २२) या बाप-लेकाने एकापाठोपाठ जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सोनी गावावर शोककळा…

‘कशापायी हट्ट केलास बाळा? लेकीला काय सांगू, मी एकटी कशी जाऊ गावाला?’ – वारीत नातू गमावलेल्या आजीच्या हुंदक्यांनी पंढरीची वाटही हेलावली!
सराटी (ता.इंदापूर) विठुरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या पंढरपूर वारीत एका २० वर्षांच्या तरुणाचा नीरा नदीच्या पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील गोविंद कल्याण फोके असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, यंदाची त्याची पहिलीच वारी आयुष्यातील शेवटची ठरली. मंगळवारी पहाटे सराटीजवळ नीरा नदीत घडलेल्या या घटनेने वारी…

Protected: शिक्रापूर येथे प्राचार्य सोनबापू गद्रे व विलास कांबळे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
There is no excerpt because this is a protected post.

वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावत लुटले
दौंड (पुणे): आषाढी वारीच्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० जून रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार,…

५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण: गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्याप्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी…

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवे पोलिस उपआयुक्त
पुणे:राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आणि नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त (DCP) म्हणून बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती, मात्र अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा बदली होऊन ते थेट पुणे शहरात…