Swarajyatimesnews

‘नटसम्राट’ नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; अभिनयाचा बुलंद आवाज कायमचा शांत!

गोव्यातील निवासस्थानी पहाटे प्रकृती बिघडली; ४५ मिनिटे CPR, तरीही जीव वाचवता आला नाही — ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास शिरूर मटा वृत्तसेवा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अस्सल अभिनयाने, भारदस्त संवादफेकीने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे गोव्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पणजीजवळील दोना पावला…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीत दुर्गामातेच्या भक्तीचा जागर; ‘होम मिनिस्टर’सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाचा भव्य सोहळा; महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, स्वयंसेवक व बॅरिकेडिंगची विशेष व्यवस्था उदयकांत ब्राम्हणे  सणसवाडी (ता. शिरूर) येथील मयूरनगर परिसरात दुर्गामातेच्या भक्तीमय जागरासह नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण ठरणाऱ्या ‘शाब्बास होम मिनिस्टर…

Read More
Swarajyatimesnews

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या माध्यमातून कोरेगाव भीमा–पेरणे बंधाऱ्याच्या दुरुस्तीला गती!

आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या माध्यमातून पाठपुरावा; पावसाळ्यापूर्वी काम सुरू होण्याची शक्यता कोरेगाव भीमा (ता. शिरूर ) : गतपावसाळ्यात भीमा नदीला आलेल्या पुरामुळे कोरेगाव भीमा–पेरणे दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची संरक्षक भिंत वाहून गेल्याने शेती, पाणी योजना आणि परिसरातील भविष्यातील पाण्याच्या गरजांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात महिलेची फसवणूक पितळेचे बिस्कीट देत केले तीन तोळे सोने लंपास!

शिक्रापूर पोलिसांची बीडमध्ये कारवाई; साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता शिरूर) आधी गोड बोलून महिलेचा विश्वास संपादन करायचा, त्यानंतर सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील दागिने लंपास करायचे आणि पोलिसांची नजर चुकवून बीडला पसार व्हायचे, अशी फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एका आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमात भटक्या कुत्र्याचा उच्छाद, ६ ते ७ कुत्र्यांसह किमान २५ जणांचा घेतला चावा

लहान मुले, विद्यार्थी, प्रवासी अन् नागरिकांवर हल्ले; वढू रोडपासून,जगताप रस्त्यासह फडतरे वस्तीपर्यंत दहशत,ग्राम प्रशासन आणखी किती चाव्यांची वाट पाहणार?, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : पुणे-नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना नागरिकांवर कुत्र्याने हल्ले करून चावा घेतल्याच्या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार किमान २५ नागरिकांना, तसेच…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर पोलिसांची धडक कामगिरी ! दहा लाखांच्या चोरीचा आंध्र प्रदेशात छडा; २.९० लाखांची रोकड जप्त

सीसीटीव्हीच्या धाग्यावरून शिक्रापूर पोलिसांची बिटरगुंट्यात कारवाई  शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसबीआय बँकेसमोर उभ्या असलेल्या क्रेटा कारची काच फोडून दहा लाख रुपये चोरणाऱ्या चोरट्याचा शोध घेत शिक्रापूर पोलिसांनी थेट आंध्र प्रदेश गाठले. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा येथे कारवाई करून पोलिसांनी चोरीच्या रकमेतील दोन लाख ९० हजार रुपये जप्त केले. तळेगाव ढमढेरे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! कारेगाव येथे पाण्याच्या प्लॅण्टवर कामगाराच्या डोक्यात गोळी झाडून हत्या

कारेगावच्या साईनगरमध्ये पहाटे थरार; दुचाकीवरून आलेल्या दोघांचा हल्ला, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध उदयकांत ब्राम्हणे कारेगाव (ता. शिरूर) येथील साईनगर परिसरात पाण्याच्या छोटेखानी फिल्टर प्लॅण्टवर काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२९ सप्टेंबर) पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हल्लेखोर दुचाकीवरून आले असल्याचे सीसीटीव्ही…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा  येथे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा , तीन तास वाहनांच्या रांगाच रांगा

 पोलीस मदत केंद्र हाकेच्या अंतरावर; तरीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी गायब! रुग्णवाहिकेसह विद्यार्थी, कामगार, प्रवासी अडकले; नागरिकांचा दोष काय? उदयकांत ब्राम्हणे  कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना मंगळवारी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुतर्फा वाहनांच्या तब्बल चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. तीन तासांहून अधिक काळ…

Read More
Swarajyatimesnews

घोडगंगा कारखाना सहकारीच राहील चेअरमन ऋषीराज पवार यांची ग्वाही तर समाजकंटक शब्दावरून विरोधक आक्रमक

३५ व्या वार्षिक सभेत गोंधळ, सभासद आक्रमक, शाब्दिक चकमकी अन् घोषणाबाजी; ‘घोडगंगाचे धुराडे पुन्हा कधी पेटणार?’ सभासदांचा सवाल — तीन हंगामांपासून कारखाना बंद, शेतकरी-कामगारांचा प्रश्न ऐरणीवर,  न्हावरे (ता. शिरूर) सलग तीन गळीत हंगामांपासून बंद असलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. १९) गोंधळ, घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमकींनी वातावरण तापले….

Read More
Swarajyatimesnews

शिरूर येथील गंगावणे हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत ठोकल्या बेड्या

शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपींना पकडले उदयकांत ब्राम्हणे शिरूर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबार करून हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांची हत्या करण्यात आली होती. या गंभीर हत्याकांडाचा तपास करत शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या ४८ तासांत तिन्ही संशयित आरोपींना सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून जेरबंद केले….

Read More
error: Content is protected !!