Category: स्थानिक वार्ता
पाबळ ग्रामीण रुग्णालयात महिनाभरात सर्व सुविधा उपलब्ध होणार; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एमपल्ले यांचे आश्वासन
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयातील बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही आणि बाळंत विभाग येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल. तसेच, पुढील एका महिन्यात शवविच्छेदन (Post-Mortem) सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांनी दिली आहे. पाबळ रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत डॉ. एमपल्ले यांनी शुक्रवारी (ता….
शिरूर तालुक्यात गोळीबार ! करडे घाटात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुण्यातील शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून झालेल्या भीषण गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. विशाल काळे असे मृत झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे….
पाबळ रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर, कुंपणच खातंय शेत, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ तर आरोग्यसेवा ‘रामभरोसे’!
जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या अचानक पाहणीत धक्कादायक वास्तव; डॉक्टर अनुपस्थित, रुग्णालयाची डी पी गायब, सरकारी खोल्या भाड्याने दिल्याने खळबळ स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्यसेवेचा प्रमुख आधार असलेले पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालय आज स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर आले आहे. ‘कुंपणच शेत खात असल्यासारखा’ धक्कादायक कारभार येथे सुरू असून, जबाबदार अधिकारीच…
विद्याधाम प्रशालेच्या १९८७ दहावी बॅचचा चौथा वर्धापन दिन ‘मोराची चिंचोली’ येथे उत्साहात साजरा!
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर येथील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या विद्याधाम प्रशालेच्या इयत्ता दहावी १९८७ बॅच परिवाराचा चौथा वर्धापन दिन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात साजरा झाला. २२ मे २०२२ रोजी या बॅचचे पहिले ऐतिहासिक ‘गेट-टुगेदर’ झाले होते, तेव्हापासून दरवर्षी हा परिवार आपला वर्धापन दिन एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेने साजरा करतो. या वर्षी या स्नेहसंमेलन…
रांजणगाव येथे बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेला १७ लाख ७६ हजारांचा गंडा
रांजणगाव पोलिसांकडून दोघांना अटक, १२ जणांवर गुन्हा दाखल रांजणगाव (ता.शिरूर): खरे सोने असल्याचे भासवून बँकेत बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेची तब्बल १७ लाख ७६ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव येथे उघडकीस आला आहे. बँकेच्याच अधिकृत सोने पारखणाऱ्याला (गोल्ड व्हॅल्यूअर) हाताशी धरून हा मोठा डल्ला मारण्यात आला असून, या प्रकरणी रांजणगाव…
पेरणे फाट्यावरील बेकायदेशीर कचरा डेपो तात्पुरता बंद; प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई
पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभालगतच्या दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कचरा डेपोप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेर गंभीर दखल घेत धडक कारवाई केली आहे. हवेली-खेड तालुका क्षेत्र अधिकारी रेखा तोगरे यांनी घटनास्थळी पाहणी करून भिमा नदीकिनारी कचरा टाकण्यास तात्काळ मज्जाव केला असून नागरिकांच्या आरोग्याला आणि भिमा नदीच्या स्वच्छतेला प्राधान्य देत…
शिक्रापूर येथे २ कोटींपेक्षा अधिक किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाने अवैध मद्य वाहतूक आणि साठ्याविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करांचे धाबे दणाणले असून विभागाच्या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. या कारवाईदरम्यान १७१६ बॉक्स अवैध मद्यसाठ्यासह दोन सहाचाकी कंटेनर वाहने जप्त करण्यात…
शेतात जनावरे शिरल्याचा जाब विचारल्याने ८० वर्षीय शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करत एक दात पाडला
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा कवठे यमाई (ता. शिरूर) येथे शेतात जनावरे शिरल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव काशीबा पोकळे (वय ८०, रा. कवठे यमाई) यांनी फिर्याद दिली आहे. २० मे…
Aggreko India : फुलगावचा जागतिक औद्योगिक नकाशावर उदय! ‘ॲग्रेको इंडिया’ उभारणार ४०० कोटींचे महाकाय केंद्र
उद्योगवाढीसाठी ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहील : जि. प. सदस्य, किरण साकोरे स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला कमालीची गती देणारी एक अत्यंत मोठी आणि अभिमानास्पद घडामोड समोर आली आहे. ऊर्जा आणि तापमान नियंत्रण क्षेत्रातील जगातील आघाडीची महाकाय कंपनी ‘ॲग्रेको इंडिया’ ही पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे तब्बल ४०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. या…
हरिनामाच्या गजरात केंदूरमध्ये श्रीमद भागवत कथेचा रंगतो भव्य सोहळा
सविता पऱ्हाड व ग्रामस्थांच्या पुढाकाराने परिसर भक्तीमय प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिरूर तालुक्यातील पऱ्हाडवाडी (केंदूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘श्रीमद भागवत कथा’ ज्ञानयज्ञामुळे संपूर्ण परिसर सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आध्यात्मिक सोहळ्याला केंदूरसह करंदी, पिंपळे-जगताप, पाबळ, धामारी आणि परिसरातील गावांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहत असून, कथा स्थळी दररोज…
