Category: Latest Update
बीजेएस महाविद्यालयात मोडी कागदपत्रे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा वाघोली (ता.हवेली) येथे सांस्कृतिक कार्य विभाग, पुराभिलेख संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र शासन आणि भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोडी कागदपत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मोडी लिपी ही भारतीय ज्ञान प्रणालीतील महत्त्वाची लिपी असून या लिपीतील दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांच्या मदतीने मध्ययुगीन काळातील…
बॅरलमध्ये भरले पाणी, डिझेल केले गायब; शिक्रापूर पोलिसांनी उघडकीस आणला ८०० लिटर डिझेल चोरीचा गुन्हा
शिक्रापूर : प्रतिनिधी राजाराम गायकवाड सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेलची चोरी करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच बॅरलमध्ये पाणी भरून ठेवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक करत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे. सुमारे ७२ हजार रुपयांच्या डिझेल चोरीप्रकरणी आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या इतर…
आषाढी वारीच्या भक्तिरंगात विशेष विद्यार्थ्यांची पालखी; वृक्षदिंडीने पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
शिक्रापूर प्रतिनिधी : राजाराम गायकवाड आषाढी वारीचे औचित्य साधत श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी मतिमंद विद्यालय, मैत्री गोल्ड सोसायटी, शिक्रापूर येथे विशेष विद्यार्थ्यांनी साकारलेला पालखी सोहळा आणि वृक्षदिंडी परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीच्या पूजनाने…
पिंपळसुटीत बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
पहाटे गोठ्याबाहेर झोपलेल्या भाग्यश्री वारे हिच्यावर बिबट्याची झडप; शोधमोहीमेसाठी पिंजरे, ड्रोन आणि कॅमेरा ट्रॅप तैनात स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी परिसरात बुधवारी (२२ जुलै) पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत मुलीचे नाव भाग्यश्री संदीप वारे (वय ५) असून ती ऊसतोड कामगाराची मुलगी होती. मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही…
अजितदादांच्या जयंतीनिमित्त केंदूर–पाबळ गटात जनसेवेचा महायज्ञ; १३ गावांत रक्तदान-आरोग्य शिबिरे
रक्तदान करणाऱ्यांसाठी ई-स्कूटर, फ्रिज, सायकलींसह रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत केंदूर–पाबळ जिल्हा परिषद गटात बुधवार (दि. २२ जुलै) रोजी भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर–आंबेगाव आणि केंदूर–पाबळ जिल्हा परिषद गटाच्या वतीने आयोजित या उपक्रमातून ग्रामीण भागातील नागरिकांना…
स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त शिरूर-हवेलीत जनसेवा सप्ताह
शिरूर-हवेली मतदारसंघात ‘जनसेवा सप्ताह’; गावागावांत मोफत आरोग्य तपासणी शिबिरांची मालिकारक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणीसह माता-बाल आरोग्य सेवा; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संपादक उदयकांत ब्राम्हणे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात ‘जनसेवा सप्ताह’ राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांची व्यापक मालिका आयोजित करण्यात आली आहे. शिरूर व…
बीजेएस महाविद्यालयात दुर्मीळ मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन, इतिहासाच्या अमूल्य ठेव्याची विद्यार्थ्यांना पर्वणी
२३ ते २४ जुलैदरम्यान आयोजन; सांस्कृतिक कार्य विभाग पुराभिलेख संचालनालय व भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा वाघोली (ता.हवेली) भारतीय इतिहास, प्रशासन आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या दुर्मीळ मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन बीजेएस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे २३ व २४ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात…
प्रेमसंबंध, चोरीचा संशय अन् सूड… पिंपळे जगताप खुनामागचे धक्कादायक सत्य समोर
पाझर तलावातील मृतदेहाचे गूढ उकलले; बिहारच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड दि. २० जुलै : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून, प्रेमसंबंध, शेतातील वीजपंप चोरीचा संशय आणि त्यातून निर्माण झालेल्या सूडाच्या भावनेतून बिहारच्या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर…
कोरेगाव भिमा येथे चोरट्यांनी ४.२५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी किरण पंडित ढेरंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह दहाव्याच्या विधीसाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे…
धक्कादायक! पिंपळे जगतापच्या पाझर तलावात तरुणाचा गळा आवळून खून करून मृतदेह पाण्यात फेकला पाण्यात
पुणे जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर , पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह विविध तपास पथकांची भेट स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात मृताच्या गळ्यावर गंभीर जखमा आढळल्याने अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा आवळून खून…
