Category: Latest Update
दोन बळी गेल्यानंतर प्रशासन जागे! शिरूर बायपासवरील धोकादायक दुभाजक अखेर बंद
हॉटेल संग्रामसमोरील दुभाजकाचे पक्के बांधकाम सुरू; पोलिसांकडून ३८ बॅरिकेड्स उभारणी — सुरक्षित पर्यायी मार्गाचीही गरज संपादक उदयकांत ब्राम्हणे शिरूर प्रतिनिधी : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर बायपासवर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांना आता वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल संग्रामसमोर झालेल्या भीषण अपघातात किशोर यादव आणि प्रथमेश लाड यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने धोकादायक…
दोन दिवसांच्या अथक शोधानंतर शेतकऱ्याचा मृतदेह हाती; आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला यश
संपादक उदयकांत ब्राम्हणे उरळगाव : विद्युत मोटारीची केबल जोडण्यासाठी गेलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना ९ ऑगस्ट रोजी उरळगाव येथे घडली होती. या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर मंगळवारी (ता. ११) यश आले. आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने अथक प्रयत्न करून संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच लोकनेते दौलत…
अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, गोळी देणार म्हणतोय! आईला फोन केल्यानंतर काही तासांत युवतीचा मृत्यू ,बारामतीत खळबळ
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा बारामतीमध्ये २३ वर्षीय युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी काही तास आधी युवतीने आईला फोन करून, “अथर्व मला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे, त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो मला गोळी खाण्यास देणार आहे,” अशी माहिती दिल्याचे तिच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी अथर्व…
शिरूर बायपासवर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात तरुण उद्योजक किशोर यादव, दुचाकीस्वार प्रथमेश लाड यांचा जागीच मृत्यू
कंटेनरच्या धडकेत एंडेव्हर उलटली; बसच्या धडकेत जागीच मृत्यू तर कंटेनर चालक पसार संपादक उदयकांत ब्राम्हणे शिरूर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ पाषाण मळा परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या चार वाहनांच्या भीषण अपघातात तरुण उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. यु-टर्न घेत असलेल्या फोर्ड एंडेव्हरला भरधाव कंटेनरने मागून दिलेली धडक, त्यानंतर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या शिवाई बसला झालेली…
कोपर्डीचे आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे निधन
२७ वर्षांच्या शैक्षणिक सेवेत हजारो विद्यार्थ्यांना घडविले; सामाजिक-धार्मिक कार्यातही होते अग्रेसर पुणे, दि. १० : कोपर्डी (ता. कर्जत) येथील आदर्श शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासह कोपर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे. कै….
भीमा नदीपात्रात अज्ञात पुरुषाचा मृतदेह; हातातील ‘स्मार्ट वॉच’ ठरणार शोधण्यात महत्त्वाचा सुगावा?
स्वराज्य टाईम्स वृत्तसेव येथील भीमा नदीच्या पात्रात अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, पोलीस पाटलांच्या माहितीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हातातील ‘स्मार्ट वॉच’वरून ओळख पटवण्याचे प्रयत्न – मृतदेहाची…
कोरेगाव भिमा येथे कुरियरचे ऑफिस फोडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याची सतर्कता अन् चोरांची तारांबळ; रिक्षा सोडून पळाले
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा सकाळची वेळ… शांतता… आणि कुरिअर कंपनीत शिरलेले तीन सराईत चोरटे! मात्र एका सतर्क कर्मचाऱ्याच्या हुशारीमुळे लाखो रुपयांचा ऐवज वाचला असून चोरांना आपली रिक्षा घटनास्थळीच सोडून पळ काढावा लागला. कोरेगाव भीमा येथील बालाजी कॉम्पलेक्समध्ये सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी ही थरारक घटना घडली. सीसीटीव्ही तोडले, लॉकर उघडले… पण! – ‘सँडोफॅक्स टेक्नॉलॉजी लि.’ या कुरिअर…
आपटी येथील २५ वर्षीय महिलेचा भीमा नदीकाठी आढळला मृतदेह; ११ महिन्यांच्या चिमुकलीचे छत्र हरपले; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या आपटी (ता. शिरूर) येथील २५ वर्षीय तरुण विवाहितेचा मृतदेह कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र कायमचे हरपले आहे. आपटी येथील रहिवासी असलेल्या निकीता अविनाश गाडेकर (वय २५)…
निमगाव म्हाळुंगेत घरफोडी; ९.५२ लाखांचे दागिने व रोख रक्कम गेली चोरीला
शिरूर, ता. ६ : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगे येथील रणदिवेवस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ९ लाख ५२ हजार ७३४ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमोल सोपान काळकुटे (वय ४०) यांनी फिर्याद दिली…
धक्कादायक ! हवेलीतील गावडेवाडीत मर्सिडीज अडवली, गोळीबार केला अन् २२ तोळे सोने हिसकावले
व्यावसायिक संतोष ज्ञानोबा गावडे जखमी वाडेबोल्हाई चौकातील आपले ऑफिस बंद करून मर्सिडीज कारने (MH 09 DX 0345) घरी परतणाऱ्या एका ५० वर्षीय व्यावसायिकाला दोन दुचाकींवरून आलेल्या तीन भामट्यांनी अडवून त्यांच्यावर थेट गोळीबार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील गावडेवाडी (शिरसवडी) येथे पंडित गावडे यांच्या बंगल्याजवळ ५ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० च्या सुमारास हा…
