
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!
दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या. पारदर्शकतेने पार पडली सोडत…

सणसवाडीतील वसेवाडी शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम
२९ विद्यार्थी चमकले सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) ने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता…

शिरूरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकास अटक
शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे यमाई येथे काल रात्री, ९ जुलै २०२५ रोजी, किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम गोरक्षनाथ कांदळकर (वय १८) या तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिवम काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास…

धक्कादायक! छांगूर बाबाने १५०० हिंदू महिलांचे केले धर्मांतरण, महाराष्ट्र कनेक्शनने खळबळ
विधवा, निपुत्रिक, परित्यक्ता, पतीशी वाद असलेल्या, कुटुंबापासून एकट्या राहणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत महिलांना केले लक्ष्य , उत्तर प्रदेश या महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याने उडाली मोठी खळबळ उत्तर प्रदेशातील जलालुद्दीन ऊर्फ छांगूर बाबा याच्या धक्कादायक कृत्यांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्याचे धर्मांतराचे रॅकेट आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याने राज्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही हादरली आहे. जलालुद्दीनने १५०० हून…

धक्कादायक! पुण्यात आई वडिलांनी अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीला ३.५ लाखांना विकले
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी एका आई-वडिलांनी आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या मुलीची ३.५ लाख रुपयांना विक्री केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे मीनल ओंकार सपकाळ (२९) आणि ओंकार औदुंबर सपकाळ (२९) अशी असून ते दोघेही बिबवेवाडीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

अल्लाने मोदींमार्फत सगळं दिलंय, मला कुणाची मदत नको! अपंग मुस्लिम व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका अपंग मुस्लिम व्यक्तीचा स्वाभिमानाने भारावलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. आपली सायकल गाडी चालवून स्वतःच्या मेहनतीवर जगणाऱ्या या व्यक्तीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या अभिनेत्री हेमा शर्माला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याचे शब्द होते, “मी स्वतःच्या मेहनतीने खातो, कुणाचं घेत नाहीत… मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा…

मिरजमध्ये लग्नाच्या वादामुळे बाप-लेकाची आत्महत्या, एकाच वेळी निघणार अंत्ययात्रा
मिरजमध्ये लग्नाच्या वादामु, मिरज: ज्या घरात महिन्याभरापूर्वी सनई-चौघडे वाजत होते, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिरज तालुक्यातील सोनी येथे लग्नाच्या वादामुळे गणेश हिंदुराव कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे (वय २२) या बाप-लेकाने एकापाठोपाठ जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सोनी गावावर शोककळा…

धक्कादायक! पुण्यात कुरिअर बॉय बनून तरुणीवर बलात्कार, आरोपीने सेल्फी काढून दिली ‘परत येईन’ची धमकी
पुणे: कोंढवा भागातील एका पॉश सोसायटीत बुधवारी (२ जुलै २०२५) संध्याकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद घटना घडली आहे. कुरिअर बॉय बनून सोसायटीत शिरलेल्या एका तरुणाने २२ वर्षीय तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपीने पीडितेसोबत सेल्फी काढून ‘मी परत येईन’ अशी धमकीही दिली. पुणे पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे. पुण्यातील…

‘कशापायी हट्ट केलास बाळा? लेकीला काय सांगू, मी एकटी कशी जाऊ गावाला?’ – वारीत नातू गमावलेल्या आजीच्या हुंदक्यांनी पंढरीची वाटही हेलावली!
सराटी (ता.इंदापूर) विठुरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या पंढरपूर वारीत एका २० वर्षांच्या तरुणाचा नीरा नदीच्या पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील गोविंद कल्याण फोके असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, यंदाची त्याची पहिलीच वारी आयुष्यातील शेवटची ठरली. मंगळवारी पहाटे सराटीजवळ नीरा नदीत घडलेल्या या घटनेने वारी…

Protected: शिक्रापूर येथे प्राचार्य सोनबापू गद्रे व विलास कांबळे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
There is no excerpt because this is a protected post.