Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
मध्यरात्री हायवेवर प्रवाशाला लुटणाऱ्यांना सीसीटीव्हीच्या मदतीने शिक्रापूर पोलिसांनी २४ तासांत केले जेरबंद
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा दि. २७ जून , राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री प्रवाशाला रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेल्यानंतर मारहाण करून मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला त्याच्या अल्पवयीन साथीदारासह शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत लुटलेला मोबाईलही हस्तगत केला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला…
शिक्रापूर परिसरात दुचाकी चोराला अटक,4 मोटारसायकली जप्त, 14 गुन्हे उघडकीस
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत जोरदार चाप बसवला आहे. तब्बल १४ गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या…
तंबाखूची पुडी अन् बिडी यावरून पोलिसांनी मध्यप्रदेशच्या चोरांना ठोकली बेडी
जुन्नर-आंबेगावातील १५० शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद, १२ गुन्हे उघड, चोरीचा मुद्देमाल जप्त स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल वायर चोरी करून तब्बल १५० शेतकऱ्यांची झोप उडवणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी पडलेल्या बिडीच्या थोटकांपासून, विशिष्ट…
धोंड्याच्या महिन्यातील सोने, कपडे मानपानासह जमिनीवरील हक्क का सोडला, या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
प्रेमविवाहानंतर सातत्याने छळ; पती, सासू-सासरेसह चौघांविरुद्ध गुन्हा स्वराज्य टाईम्स न्यूज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे हुंडा, धोंड्याच्या महिन्यातील सोने-कपडे तसेच माहेरच्या जमिनीतील हिस्सा आणण्यासाठी होत असलेल्या कथित मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी मृत विवाहितेचा पती, सासू, सासरे आणि…
भर कोर्टात थरार! “तो प्रसंग आठव आणि तूच सांग काय शिक्षा देऊ?”; न्यायाधीशांच्या थेट प्रश्नाने नराधम भीमराव कांबळेची बोबडी वळाली!
स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या खटल्यात विशेष न्यायालयाने ऐतिहासिक आणि अत्यंत वेगवान सुनावणी घेत नराधम आरोपी भीमराव कांबळे याला सर्व आरोपांखाली दोषी जाहीर केले आहे. अवघ्या ५५ दिवसांत न्यायालयाने हा निकाल दिला असून, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कोर्टरूममध्ये न्यायाधीशांनी आरोपीला थेट विचारलेल्या एका प्रश्नाने नराधमाची बोलतीच बंद…
भावडीत महसूल विभागाची ४२२ ब्रास अवैध उत्खननावर धडक कारवाई
दोन वाहने ताब्यात, पोकलॅन्डही रडारवर हवेली तालुक्यातील भावडी परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत सुमारे ४२२ ब्रास गौण खनिजाचा पंचनामा केला आहे. तसेच अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहने ताब्यात घेण्यात आली असून पुढील कारवाईसाठी ती पेरणे फाटा पोलीस चौकी येथे जमा करण्यात आली आहेत. बेकायदेशीर अवैध…
धक्कादायक! खराडीत कौटुंबिक वादातून पतीने झोपेतच पत्नीचा गळा चिरला; कान आणि नाक कापून केली निर्घृण हत्या
स्वराज्य टाइम्स न्यूज पुण्यातील खराडी परिसरातील भनगाई वस्तीत एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाच्या टोकातून एका पतीने आपल्या पोटच्या मुलांसमोरच पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. पहाटेच्या सुमारास पत्नी गाढ झोपेत असताना पतीने तिच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि एवढ्यावरच न थांबता तिचे कान आणि नाकही कापून काढले. या रक्ताळलेल्या घटनेमुळे…
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिक्रापूरच्या सुधीर मुळे यांचा ‘नियतीचे चक्र’ सन्मान
स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाची चळवळ उभी करून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे ASN कॉम्प्युटर एज्युकेशन, शिक्रापूरचे संचालक सुधीर व्यंकटराव मुळे यांना मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ सन्मान प्रदान करण्यात आला. मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. भारतीय जैन संघटना (BJS) आणि दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने…
गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार गणेश फडतरेची एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी
शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुणे शहरालगत वेगाने विकसित होत असलेल्या शिक्रापूर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारास महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. गणेश भाऊसाहेब फडतरे (वय…
श्रमदान, वृक्षारोपण अन् शिवविचारांचा संगम ‘आपला मावळा’ने चेतवली इतिहास संवर्धनाची ज्योत
आपला मावळा’च्या मोहिमेत वढू-तुळापूर येथे स्वच्छता, वृक्षारोपण आणि शिवव्याख्यान, ‘गड-किल्ले संवर्धनास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव भिमा (ता . शिरूर) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या वढू-तुळापूर भूमीत इतिहास संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळाला. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने आयोजित गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन…
