Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
शिरूर येथील गंगावणे हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत ठोकल्या बेड्या
शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपींना पकडले उदयकांत ब्राम्हणे शिरूर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबार करून हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांची हत्या करण्यात आली होती. या गंभीर हत्याकांडाचा तपास करत शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या ४८ तासांत तिन्ही संशयित आरोपींना सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून जेरबंद केले….
गंभीर मारहाण प्रकरणात मुख्य आरोपीला अटकपूर्व जामीन
गवडगाव मावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश ,ॲड. नकुल शहाणे यांचा प्रभावी युक्तिवाद वडगाव मावळ : रावेत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणात अटक होण्याची शक्यता असलेल्या मुख्य आरोपीला वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा आदेश दिला.या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय…
शिक्रापूर पोलिसांकडून १३ लाख ६० हजारांच्या ३२ दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात
गुन्हे, अपघात व बेवारस स्थितीत सापडलेल्या वाहनांचा शोध; मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिनिधि राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता.शिरूर) गुन्हे, अपघात तसेच बेवारस स्थितीत सापडून शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात दीर्घकाळ पडून असलेल्या वाहनांपैकी ३२ दुचाकींचा शोध घेऊन त्या त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १३ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती…
लोणीकंदच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ८५ सायकलींचे वाटप
प्रदीप कंद यांच्या स्वखर्चातून ६ लाख ५० हजार रुपयांच्या सायकली; २ हजार पालकांची उपस्थिती उदयकांत ब्राम्हणे लोणीकंद (ता.हवेली) पी.एम.श्री. व मॉडेल स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद येथे गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) पालक सभा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय…
ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांच्या हाती प्रशासक म्हणून झाली नेमणूक!
मुदत संपलेल्या, निवडणुका रखडलेल्या ग्रामपंचायतींसाठी शासनाचा मोठा निर्णय; जिल्हा परिषद सीईओंना नियुक्तीचे अधिकार! स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा मुंबई : मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणूक घेता न आलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांच्या हाती जाणार आहे. राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. …
अमरावतीतून घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद २४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शिक्रापूर-शिरूरमधील तीन घरफोड्या उघड; १६ तोळे सोन्यासह दुचाकी जप्त स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर : महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून अटक केली. दीपक भीमराव दांडे (वय २५, रा. घुगरी, ता. भैंसदेही, जि. बैतूल, मध्य प्रदेश; सध्या रा. कविठा, ता. अचलपूर, जि. अमरावती)…
‘डॉल्बी’चा दणदणाट अन् ‘लेझर’चा झगमगाट बंद! उत्सवाचा जल्लोष नियमांतच कराभी – चंद्रशेखर यादव
शिक्रापूर पोलिसांची साऊंड-लाईट चालकांना सक्त ताकीद; नियमभंग करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा राजाराम गायकवाड दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवातील ध्वनी आणि प्रकाशाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. कर्णकर्कश आवाज करणारे प्रेशर साऊंड, प्लाझ्मा तसेच डोळ्यांना अपायकारक ठरणारे लेझर आणि हायबीम शार्पी लाईट वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक…
पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी – पती राहुल गई
शस्त्रक्रियेदरम्यान, पत्नीची प्रकृती गंभीर झाली तर मला सांगितले का नाही, मला भेटू का दिले नाही, तीच्यावरील नेमक्या उपचारांची माहिती का दिली नाही. शिरूर – पूजा राहुल गई (वय-२८, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांचा हाताच्या कोपरावर शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांचे पती राहुल देवीदास गई यांनी केली आहे. या मागणीसाठी…
शिक्रापूर पोलिसांना महिला पोलीस पाटलांनी बांधली राखी
शिक्रापूर (ता. शिरूर) सामाजिक बांधिलकी आणि रक्षणाचे वचन जपत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. या कार्यक्रमास पिंपळे जगताप येथील महिला पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे आणि बुरुंजवाडी येथील महिला पोलीस पाटील…
‘अशोक बाप्पू, २०२९ च्या विधानसभेसाठी इकडे या!’
वैतागलो राव… इकडच्या नेत्यांना साधा फोनही करता येत नाही’; मुखईकरांची व्यथा शिक्रापूर, ता. २९ “अशोक बाप्पू, सन २००९ पासून थेट आमदारांशी संवाद साधणेच बंद झाले आहे. इकडच्या नेत्यांना साधा फोनही करता येत नाही. तुम्ही आता इकडे आलात तर आम्हाला तुम्हाला मतदान करण्याची संधी तरी मिळेल. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी या आणि सन २०२९ च्या विधानसभा…
