Swarajyatimesnews

पित्याची काळजी, पोलिसांची माणुसकी! तेलंगणात शोधल्या मायलेकी; संसाराचा धागा जोडला!

पत्नीचा मोजक्या शब्दांत संवाद अन् अचानक संपर्क बंद; अडीच वर्षांच्या चिमुकलीच्या काळजीने व्याकूळ झालेल्या पित्याला पोलिसांचा मायेचा आधार; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली अजित इंगवले, ललित चक्रनारायण यांची तेलंगणात धडाकेबाज शोधमोहीम! उदयकांत ब्राम्हणे  कोरेगाव भिमा (ता. शिरूर)काही क्षणांची शांतताही कधी कधी आयुष्यभराची अस्वस्थता देऊन जाते… एका बाजूला पत्नी कुठे असेल, ती सुरक्षित असेल ना?…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यातून चोरीला गेलेली फॉर्च्युनर थेट आंध्र प्रदेशात! शिक्रापूर पोलिसांचा पाच दिवसांचा मुक्काम; अखेर माजी सरपंचांचा त्याच गाडीतून परतीचा प्रवास!!

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरट्यांनी फॉर्च्युनर केली होती लंपास! पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या पाठपुराव्याला यश! उदयकांत ब्राम्हणे  कोरेगाव भिमा (ता. शिरूर) अवघ्या साडेसात मिनिटांत फॉर्च्युनर चोरून चोरटे पसार झाले; मात्र वर्षभरानंतर त्याच फॉर्च्युनरचा ठावठिकाणा थेट आंध्र प्रदेशात लागला! कोरेगाव भीमा येथील माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची चोरीला गेलेली टोयोटा फॉर्च्युनर शोधून…

Read More
Swarajyatimesnews

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तुले जप्त!

128.3 ग्रॅम मेफेड्रोन, तीन गावठी पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे जप्त; एमडी विक्री व पुरवठा साखळीतील सात आरोपींना अटक, 23.27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत उदयकांत ब्राम्हणे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची विक्री आणि अवैध शस्त्रांच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणी-कंद पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाच्या विक्री व पुरवठा साखळीचा पर्दाफाश करत सात…

Read More
Swarajyatimesnews

मलठणमध्ये मध्यरात्री घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण; चुलतीचेही दागिने लुटले!

चार मुखवटाधारी चोरट्यांचा धुमाकूळ; सुमारे १ लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास उदयकांत ब्राम्हणे शिरूर : शिरूर तालुक्यातील मलठण येथील दंडवतेदरा परिसरात मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या चुलतीला मारहाण करत सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना घडली. ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण…

Read More
Swarajyatimesnews

ठिकाण बदलले, राज्य बदलले, हरियाणात लपले; पण शिक्रापूर पोलिसांनी शोधून काढले!

डिंग्रजवाडीतील पाच लाखांचे सर्व्हे मशिन चोरीप्रकरणी दोघांना अटक; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तांत्रिक तपासाच्या जोरावर आंतरराज्यीय कारवाई उदयकांत ब्राम्हणे शिक्रापूर (ता. शिरूर) चोरी केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आरोपींनी राज्य बदलले, ठिकाण बदलले आणि हरियाणात जाऊन आश्रय घेतला; मात्र शिक्रापूर पोलिसांची तपासाची चक्रे थांबली नाहीत. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर अखेर आरोपींचा…

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुकमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा; एक हजार लिटर रसायन जप्त

पोलिसांची चाहूल लागताच संशयित उसाच्या शेतात पसार; ३० हजारांचा मुद्देमाल शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे अवैध गावठी दारू निर्मितीचा प्रकार उघडकीस आला आहे. म्हाळण ओढ्याजवळ काटेरी झुडपांच्या आड सुरू असलेल्या कथित हातभट्टीवर शिरूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे एक हजार लिटर कच्चे रसायन आढळले असून, त्याची किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादी जबाबात नमूद…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापुरात मध्यरात्री विहिरीत पडली महिला, पोलीस कर्मचाऱ्याची धाडसी उडी, आपदा मित्रांच्या मदतीने वाचले प्राण

शिक्रापूर, ता. शिरूर : चाकण रोडलगत अथर्वनगर येथे रात्रीच्या सुमारास विहिरीत पडलेल्या महिलेला शिक्रापूर पोलीस आणि आपदा मित्रांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. रात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पोलीस शिपाई शरद धूरपते यांनी कोणतीही पर्वा न करता थेट विहिरीत उडी घेतली, तर पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे आणि आपदा मित्रांनीही विहिरीत उतरून महिलेला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात महिलेची फसवणूक पितळेचे बिस्कीट देत केले तीन तोळे सोने लंपास!

शिक्रापूर पोलिसांची बीडमध्ये कारवाई; साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता शिरूर) आधी गोड बोलून महिलेचा विश्वास संपादन करायचा, त्यानंतर सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील दागिने लंपास करायचे आणि पोलिसांची नजर चुकवून बीडला पसार व्हायचे, अशी फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एका आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमात भटक्या कुत्र्याचा उच्छाद, ६ ते ७ कुत्र्यांसह किमान २५ जणांचा घेतला चावा

लहान मुले, विद्यार्थी, प्रवासी अन् नागरिकांवर हल्ले; वढू रोडपासून,जगताप रस्त्यासह फडतरे वस्तीपर्यंत दहशत,ग्राम प्रशासन आणखी किती चाव्यांची वाट पाहणार?, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : पुणे-नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना नागरिकांवर कुत्र्याने हल्ले करून चावा घेतल्याच्या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार किमान २५ नागरिकांना, तसेच…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर पोलिसांची धडक कामगिरी ! दहा लाखांच्या चोरीचा आंध्र प्रदेशात छडा; २.९० लाखांची रोकड जप्त

सीसीटीव्हीच्या धाग्यावरून शिक्रापूर पोलिसांची बिटरगुंट्यात कारवाई  शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसबीआय बँकेसमोर उभ्या असलेल्या क्रेटा कारची काच फोडून दहा लाख रुपये चोरणाऱ्या चोरट्याचा शोध घेत शिक्रापूर पोलिसांनी थेट आंध्र प्रदेश गाठले. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा येथे कारवाई करून पोलिसांनी चोरीच्या रकमेतील दोन लाख ९० हजार रुपये जप्त केले. तळेगाव ढमढेरे…

Read More
error: Content is protected !!