प्रदीप कंद यांच्या स्वखर्चातून ६ लाख ५० हजार रुपयांच्या सायकली; २ हजार पालकांची उपस्थिती
उदयकांत ब्राम्हणे
लोणीकंद (ता.हवेली) पी.एम.श्री. व मॉडेल स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद येथे गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) पालक सभा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या ८५ गुणवंत विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पी.डी.सी.सी. बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी आपल्या स्वखर्चातून सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ८५ सायकली विद्यार्थ्यांना भेट दिल्या. इयत्ता चौथी, पाचवी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय, ज्ञानप्रबोधिनी व सैनिकी शाळेत निवड झालेले विद्यार्थी तसेच रोबोटिक्सअंतर्गत युरोप दौरा, फ्रेंच व जर्मन परकीय भाषा, नासा, इस्त्रो, ESA आणि राष्ट्रपती भवनाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता.
गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी सायकल बक्षीस देण्याची घोषणा प्रदीप कंद यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत ८५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण केले. या कार्यक्रमाला सुमारे २ हजार पालक उपस्थित होते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीला ‘राज्यस्तरीय आदर्श शाळा व्यवस्थापन समिती’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप कंद होते.नासा येथे भेट देऊन आलेली विद्यार्थिनी श्रावणी संदीप मगर आणि इस्त्रोला भेट दिलेली विद्यार्थिनी स्वरा सचिन पिंगळे यांनी आपल्या दौऱ्याचे अनुभव कथन केले.यावेळी सरपंच दिपाली राऊत, माजी सरपंच अनिल होले, बाजार समितीचे उपसभापती रविंद्र कंद, संत विचार प्रसारक व प्रबोधन केंद्राचे संस्थापक उत्तम भोंडवे यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. शाळेत येताना राजकारण हा विषय डोक्यात नसावा. महाराष्ट्रात शाळेसाठी सर्वात मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून शाळा दिवसेंदिवस मोठी होत आहे. आज सुमारे २ हजार तळागाळातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रदीप कंद यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच सागर कंद, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व चेअरमन संजय कंद, जनार्दन वाळुंज, माजी सरपंच सुप्रिया कंद, राहुल शिंदे, सरस्वती दळवी, ओंकार कंद, उपसरपंच सुधीर कंद, डॉ. सोनाली जगताप, सुजाता कंद, ग्रामपंचायत सदस्य कावेरी कंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कंद, उपाध्यक्ष गोपीनाथ कंद, पै. सोहम शिंदे, प्रसाद होले, रेखा गर्जे, वनिता शिंदे, प्रिती कंद, नितीन शिंदे, भारत झुरुंगे, माऊली कंद आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक एकनाथ शिंदे यांनी केले, तर आभार संतोष जाधव यांनी मानले.
