Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त शिरूर-हवेलीत जनसेवा सप्ताह
शिरूर-हवेली मतदारसंघात ‘जनसेवा सप्ताह’; गावागावांत मोफत आरोग्य तपासणी शिबिरांची मालिकारक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणीसह माता-बाल आरोग्य सेवा; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संपादक उदयकांत ब्राम्हणे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात ‘जनसेवा सप्ताह’ राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांची व्यापक मालिका आयोजित करण्यात आली आहे. शिरूर व…
बीजेएस महाविद्यालयात दुर्मीळ मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन, इतिहासाच्या अमूल्य ठेव्याची विद्यार्थ्यांना पर्वणी
२३ ते २४ जुलैदरम्यान आयोजन; सांस्कृतिक कार्य विभाग पुराभिलेख संचालनालय व भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा वाघोली (ता.हवेली) भारतीय इतिहास, प्रशासन आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या दुर्मीळ मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन बीजेएस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे २३ व २४ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात…
प्रेमसंबंध, चोरीचा संशय अन् सूड… पिंपळे जगताप खुनामागचे धक्कादायक सत्य समोर
पाझर तलावातील मृतदेहाचे गूढ उकलले; बिहारच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड दि. २० जुलै : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून, प्रेमसंबंध, शेतातील वीजपंप चोरीचा संशय आणि त्यातून निर्माण झालेल्या सूडाच्या भावनेतून बिहारच्या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर…
कोरेगाव भिमा येथे चोरट्यांनी ४.२५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी किरण पंडित ढेरंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह दहाव्याच्या विधीसाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे…
धक्कादायक! पिंपळे जगतापच्या पाझर तलावात तरुणाचा गळा आवळून खून करून मृतदेह पाण्यात फेकला पाण्यात
पुणे जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर , पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह विविध तपास पथकांची भेट स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात मृताच्या गळ्यावर गंभीर जखमा आढळल्याने अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा आवळून खून…
रात्रीच्या अंधारात डाळिंब बागेवर चोरट्यांचा धाडसी डल्ला!
८० हजारांची ८०० किलो ‘सुपर भगवा’ डाळिंबे लंपास; शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत डाळिंब बागेवर धाडसी डल्ला मारत तब्बल ८०० किलो ‘सुपर भगवा’ जातीची डाळिंबे लंपास केली. या चोरीमुळे शेतकरी राजाराम भानुदास ओव्हाळ यांना सुमारे ८० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये…
कोरेगाव भिमा येथे भीषण अपघात दुचाकीस्वाराचा मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
अपघात ग्रस्तांना माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उद्योजक सुनील गव्हाणे, संजय सोनवणे, किरण गव्हाणे, योगेश भंडारे, प्रविण गव्हाणे यांनी तातडीने मोलाची मदत केली. स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा–पिंपळे जगताप मार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी स्प्लेंडर मोटारसायकलवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे….
धक्कादायक ! निमगाव म्हाळुंगी येथे व्यसनाधीन मुलाने केला जन्मदात्या आईचा खून
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा “आई” हा शब्द मायेचा, त्यागाचा आणि प्रेमाचा मानला जातो. मात्र शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने जन्मदात्या आईलाच बेदम मारहाण करून तिचा जीव घेतल्याचा आरोप असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदा रामोबा चौधरी (वय ६०, रा. निमगाव…
लोकसेवेचा ध्यास, विकासाची दूरदृष्टी; कोरेगाव भिमाच्या सर्वांगीण प्रगतीचे कृतिशील सक्षम युवा नेतृत्व – कोमल नितीन गव्हाणे
लोकविश्वास हीच खरी ताकद, समाजसेवा हीच ओळख आणि विकास हेच ध्येय; शिक्षण, संस्कार, संवेदनशीलता व दूरदृष्टीच्या बळावर कोरेगाव भीमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सक्षम नेतृत्व. कोरेगाव भीमा हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आज विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभे आहे. या गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत…
महामार्गावरील २०० अनधिकृत जाहिरात फलक हटविले; शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई
अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेला धोका ठरणारे तब्बल २०० अनधिकृत जाहिरात फलक शिक्रापूर पोलिसांनी हटवून धडक कारवाई केली. महामार्गाच्या दुभाजकावर नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या या फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता कमी होत होती. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार मिलिंद देवरे आणि…
