Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
खाकी वर्दीमागील माणुसकी! हवालदार मिलिंद देवरे ठरले देवदूत; भयभीत चिमुकली सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन
मद्यधुंद व्यक्तीसोबत रात्री रस्त्यावर सापडलेल्या तीन वर्षीय बालिकेला पोलिसांनी दिला जीवदानाचा आधार; कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पोलीस म्हणजे केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नाही, तर संकटाच्या क्षणी धावून येणारा विश्वासाचा हात असतो, याची प्रचिती शिक्रापूरमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून पुन्हा एकदा आली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेमुळे…
वारीत काळाचा घाला! जेजुरीत दिंडीच्या ट्रकने सात वारकऱ्यांना चिरडले, तिघींचा मृत्यू
चार महिला गंभीर जखमी; ट्रक चालक ताब्यात, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर जेजुरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सोमवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ दिंडीतील ट्रकने सात वारकरी महिलांना धडक दिल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात…
व्यापाऱ्यांना दिलासा! अडचणींवर तात्काळ उपाय; बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा इशारा
शिक्रापूरमध्ये व्यापाऱ्यांसाठी विशेष बैठक; खंडणीखोर, रोडरोमिओ आणि बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा “शिक्रापूरमधील व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा भीतीला बळी पडू नये. खंडणी, दमदाटी, धमक्या किंवा बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. व्यापाऱ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही,” असा ठाम विश्वास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे…
वेळ नदीला प्रदूषणाचा विळखा? पुलावर दहा फूट फेसाचे ढीग; मानवी जीवन, शेती आणि पर्यावरण धोक्यात
ग्रामपंचायतीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र; प्रदूषणाचा स्रोत शोधून दोषींवर कठोर कारवाईची मागणी स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे परिसरातील वेळ नदीत सोमवारी रात्री निर्माण झालेल्या तब्बल दहा फूट उंच फेसाच्या ढिगाऱ्यांनी संपूर्ण परिसर हादरला आहे. श्रीनाथ मंदिर–पांढरी वस्ती मार्गावरील पुलावर फेसाचा प्रचंड साठा झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली. ही घटना केवळ वाहतुकीची…
मुसळधार पावसाने भीमा नदीला पूर कोरेगाव भीमाचा दहावा घाट जलमय
विद्युत पंपांना पुराचा धोका; नदीकाठचा परिसर पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीने धोकादायक पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कोरेगाव भीमा येथील दहावा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नदीकाठचा विस्तीर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण…
क्षणभर थांबले श्वास… पुरात वाहून गेलेले महादेव राऊत दीड तासांनी सुखरूप किनाऱ्यावर
पोलिस हवालदार हेमंत कुंजीर यांच्या तत्परतेने एनडीआरएफ, ड्रोन व प्रशासनाची शोधमोहीम , ‘ते पोहत किनाऱ्यावर येतील’… पोलिस पाटील जयसिंग भंडारे यांचा विश्वास ठरला खरा वढू बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वढू बुद्रुक ते चौफुला येथील रस्त्यावरील भराव पुन्हा एकदा वाहून गेला. गेल्या वर्षीही याच ठिकाणी भराव वाहून गेला होता. मात्र, त्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना न…
राहूचे माजी सरपंच दत्तात्रय महादू शिंदे यांचे निधन
राहू (ता. शिरूर) : राहू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, ज्येष्ठ समाजसेवक आणि गावाच्या विकासासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले कै. स्वर्गीय दत्तात्रय महादू शिंदे (वय ८७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राहू गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. कै. दत्तात्रय शिंदे यांनी माजी सरपंच म्हणून कार्यरत असताना गावाच्या विकासाला प्राधान्य देत…
सेवाभावी ‘तात्या’ काळाच्या पडद्याआड गेल्याने सोनेसांगवीवर शोककळा
सोनेसांगवी (ता. शिरूर ) पंचक्रोशीत तात्या नावाने प्रसिद्ध असलेल्या अनेक लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे त्यांच्या मदतीसाठी नेहमी हसतमुखाने उभे असणारे ते सेवाभावी व्यक्तिमत्त्व विश्वनाथ उर्फ तात्या शंकर दाते (वय ५८) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सोनेसांगवी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. विश्वनाथ दाते…
तुकाराम मुंढेंच्या धडाक्याने ताटातील ‘लाल’ रंग हद्दपार; ग्राहकांच्या आरोग्याला मोठा दिलासा
अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर कारवाईचा ग्रामीण महाराष्ट्रातही प्रभाव; मिसळ, चायनीज, तंदुरी, पनीरसह विविध खाद्यपदार्थांतील कृत्रिम रंगांचा वापर घटला अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईचा प्रभाव आता शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण महाराष्ट्रातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कृत्रिम रासायनिक रंगांवर प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे…
शिरूर बाजार समिती निवडणुकीला उच्च न्यायालयाचा ब्रेक; मतदानाच्या दोन दिवस आधी प्रक्रिया रद्द, नव्याने निवडणूक होणार
अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा ब्रेक लावत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली. अपूर्ण मतदार यादीच्या आधारे होणारी निवडणूक स्वतंत्र, निष्पक्ष आणि कायदेशीर ठरू शकत नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने नव्याने मतदार यादी तयार करून संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात मोठी…
