कोरेगाव भिमा येथे भीषण अपघात दुचाकीस्वाराचा मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

Swarajyatimesnews

अपघात ग्रस्तांना  माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उद्योजक सुनील गव्हाणे,  संजय सोनवणे, किरण गव्हाणे, योगेश भंडारे, प्रविण गव्हाणे यांनी तातडीने मोलाची मदत केली.

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा–पिंपळे जगताप मार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी स्प्लेंडर मोटारसायकलवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामप्रसाद रोशनलाल कोकुटे (वय ३२) हे १४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास कोरेगाव भीमा–पिंपळे जगताप रस्त्यावरील छत्रपती हायस्कूलसमोरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या एमएच १२ एक्सबी २४४३ क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरील अज्ञात चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात रामप्रसाद कोकुटे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात स्प्लेंडरवरील चालकालाही दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी विकास चंदनलाल मेश्राम (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात स्प्लेंडर मोटारसायकलवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नाईकडे करीत आहेत.अपघात ग्रस्तांना  माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उद्योजक सुनील गव्हाणे,  संजय सोनवणे, किरण गव्हाणे, योगेश भंडारे, प्रविण गव्हाणे यांनी तातडीने मोलाची मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!