Swarajyatimesnews

सणसवाडीत दुर्गामातेच्या भक्तीचा जागर; ‘होम मिनिस्टर’सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाचा भव्य सोहळा; महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, स्वयंसेवक व बॅरिकेडिंगची विशेष व्यवस्था उदयकांत ब्राम्हणे  सणसवाडी (ता. शिरूर) येथील मयूरनगर परिसरात दुर्गामातेच्या भक्तीमय जागरासह नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण ठरणाऱ्या ‘शाब्बास होम मिनिस्टर…

Read More
Swarajyatimesnews

उत्सव करा, दहशत नको! कोरेगाव भिमातील गणेश मंडळांना पोलिसांचा कडक इशारा

 कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा उदयकांत ब्राम्हणे  कोरेगाव भीमा (ता.शिरूर) सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, डीजेच्या अमर्यादित आवाजाला आळा घालण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला. कोरेगाव भीमा येथे…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे कुरियरचे ऑफिस फोडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याची सतर्कता अन् चोरांची तारांबळ; रिक्षा सोडून पळाले

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा सकाळची वेळ… शांतता… आणि कुरिअर कंपनीत शिरलेले तीन सराईत चोरटे! मात्र एका सतर्क कर्मचाऱ्याच्या हुशारीमुळे लाखो रुपयांचा ऐवज वाचला असून चोरांना आपली रिक्षा घटनास्थळीच सोडून पळ काढावा लागला. कोरेगाव भीमा येथील बालाजी कॉम्पलेक्समध्ये सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी ही थरारक घटना घडली. सीसीटीव्ही तोडले, लॉकर उघडले… पण! – ‘सँडोफॅक्स टेक्नॉलॉजी लि.’ या कुरिअर…

Read More
Swarajyatimesmews

कोरेगाव भिमा येथे बेकायदेशीर प्रार्थना व हिंदू देवी-देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 शंकर, श्रीराम, गणपतींना मानू नका, मूर्तींचे विसर्जन करा…” वादग्रस्त भाषणाने धार्मिक भावना दुखावल्या स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील कल्याणी फाटा परिसरातील एका इमारतीमध्ये बेकायदेशीररीत्या प्रार्थना सभा भरवून हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकाविरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा (NCR)…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे चोरट्यांनी ४.२५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा   शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी किरण पंडित ढेरंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह दहाव्याच्या विधीसाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे भीषण अपघात दुचाकीस्वाराचा मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

अपघात ग्रस्तांना  माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उद्योजक सुनील गव्हाणे,  संजय सोनवणे, किरण गव्हाणे, योगेश भंडारे, प्रविण गव्हाणे यांनी तातडीने मोलाची मदत केली. स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा–पिंपळे जगताप मार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी स्प्लेंडर मोटारसायकलवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे….

Read More
Swarajyatimesnews

लोकसेवेचा ध्यास, विकासाची दूरदृष्टी; कोरेगाव भिमाच्या सर्वांगीण प्रगतीचे कृतिशील सक्षम युवा नेतृत्व – कोमल नितीन गव्हाणे

लोकविश्वास हीच खरी ताकद, समाजसेवा हीच ओळख आणि विकास हेच ध्येय; शिक्षण, संस्कार, संवेदनशीलता व दूरदृष्टीच्या बळावर कोरेगाव भीमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सक्षम नेतृत्व. कोरेगाव भीमा हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आज विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभे आहे. या गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत…

Read More
Swarajyatimesnews

मुसळधार पावसाने भीमा नदीला पूर कोरेगाव भीमाचा दहावा घाट जलमय

विद्युत पंपांना पुराचा धोका; नदीकाठचा परिसर पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीने धोकादायक पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कोरेगाव भीमा येथील दहावा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नदीकाठचा विस्तीर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण…

Read More
Swarajyatimesnews

क्षणभर थांबले श्वास… पुरात वाहून गेलेले महादेव राऊत दीड तासांनी सुखरूप किनाऱ्यावर

पोलिस हवालदार हेमंत कुंजीर यांच्या तत्परतेने एनडीआरएफ, ड्रोन व प्रशासनाची शोधमोहीम , ‘ते पोहत किनाऱ्यावर येतील’… पोलिस पाटील जयसिंग भंडारे यांचा विश्वास ठरला खरा वढू बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वढू बुद्रुक ते चौफुला येथील रस्त्यावरील भराव पुन्हा एकदा वाहून गेला. गेल्या वर्षीही याच ठिकाणी भराव वाहून गेला होता. मात्र, त्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना न…

Read More
Swarajyatimesnews

गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार गणेश फडतरेची एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुणे शहरालगत वेगाने विकसित होत असलेल्या शिक्रापूर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारास महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. गणेश भाऊसाहेब फडतरे (वय…

Read More
error: Content is protected !!