Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे भीषण अपघात दुचाकीस्वाराचा मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

अपघात ग्रस्तांना  माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उद्योजक सुनील गव्हाणे,  संजय सोनवणे, किरण गव्हाणे, योगेश भंडारे, प्रविण गव्हाणे यांनी तातडीने मोलाची मदत केली. स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा–पिंपळे जगताप मार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी स्प्लेंडर मोटारसायकलवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे….

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! निमगाव म्हाळुंगी येथे व्यसनाधीन मुलाने केला जन्मदात्या आईचा खून

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा “आई” हा शब्द मायेचा, त्यागाचा आणि प्रेमाचा मानला जातो. मात्र शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने जन्मदात्या आईलाच बेदम मारहाण करून तिचा जीव घेतल्याचा आरोप असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदा रामोबा चौधरी (वय ६०, रा. निमगाव…

Read More
Swarajyatimesnews

वारीत काळाचा घाला! जेजुरीत दिंडीच्या ट्रकने सात वारकऱ्यांना चिरडले, तिघींचा मृत्यू

चार महिला गंभीर जखमी; ट्रक चालक ताब्यात, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर जेजुरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सोमवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ दिंडीतील ट्रकने सात वारकरी महिलांना धडक दिल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात…

Read More
Swarajyatimesnews

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या शिरूर दौऱ्यात शिक्षण-आरोग्य सुविधांवर भर

शिक्रापूर-कोयाळीच्या विकासाला नवी गती स्वराज्य टाईम्स न्यूज शिक्रापूर आणि कोयाळी गावठाण परिसरातील रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत विशेष पाहणी दौरा आणि आढावा बैठक पार पडली. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात झालेल्या सखोल चर्चेमुळे परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून प्रशासनानेही विविध मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे संकेत…

Read More
Swarajyatimesnews

सलाम माणुसकीला! शिरूरमध्ये रस्त्यात प्रसूती होणाऱ्या महिलेसाठी डॉक्टर, नगरसेविका अन पत्रकार बनले देवदूत

शिरूर येथील जोशीवाडी परिसरातील एक गर्भवती महिला प्रसूती कळा सुरू झाल्याने आपल्या पतीसोबत ग्रामीण रुग्णालयाकडे पायी चालली होती. मात्र, निर्माण प्लाझा जवळ येताच तिला वेदना असह्य झाल्या आणि ती रस्त्यातच बसली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पत्रकार सुदर्शन दरेकर यांनी तत्काळ डॉ. संतोष पोटे यांना संपर्क साधला. काही वेळातच डॉ. सुनिता पोटे आणि नगरसेविका पूजा पोटावळे घटनास्थळी…

Read More
swarajyatimesnews@gmail.com

मुलगी पाहायला गेले अन् नवरी घेऊनच परतले, अनावश्यक खर्चाला फाटा देत देशमुख-कुंदे परिवाराचा आदर्श

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) आजच्या काळात लग्न म्हणजे केवळ दोन जिवांचे मिलन न राहता, तो एक अवाढव्य आर्थिक सोहळा आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन बनले आहे. लाखो रुपयांची उधळण, डीजेचा कर्णकर्कश आवाज, पंचतारांकित जेवणावळी आणि मान-पानाच्या नावाखाली होणारी वरात या सर्वांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. मात्र, या सर्व बडेजावाला फाटा…

Read More
Swarajyatimesnews

श्री स्वामी समर्थ जयघोषाने राधेश्वरीनगर दुमदुमले, बालस्वामींच्या दर्शनाने भाविक भारावले!

वाघोली (ता. हवेली) राधेश्वरीनगर येथील श्रीगुरुदेव दत्त मंदिरात भगवान दत्तात्रेयांचा तृतीय अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या सोहळ्यात बालस्वामींच्या दर्शनाने भाविकांचे डोळे दिपले. उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटे भूपाळी…

Read More
swarajyatimesnews

धक्कादायक ! शिरूरमध्ये मोबाईल ॲपच्या स्क्रीनवर ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्या हायटेक रॅकेटचा पर्दाफाश!

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंटवर कठोर कारवाईची प्रक्रिया…

Read More
Swarajyatimesnews

शंभूराजांच्या शौर्याला रक्तदानाची मानवंदना! वढू बुद्रुकमध्ये ५२७१ शंभूभक्तांचे विक्रमी रक्तदान

धारकऱ्यांची अनोखी शौर्य, त्याग आणि समाजसेवा वढू बुद्रुक (ता.शिरूर) भीमा नदीच्या शांत तीरावर उभे असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ… वातावरणात दाटलेली गंभीरता… आणि हजारो शंभूभक्तांच्या शिरांमधून वाहणारे रक्त समाजकार्यासाठी अर्पण करण्याची जाज्वल्य तयारी! धर्मवीरांच्या ३३७ व्या बलिदान मासानिमित्त वढू बुद्रुक येथे पार पडलेला ‘रक्तदान महायज्ञ’ यंदा अक्षरशः इतिहास घडवून गेला. तब्बल ५२७१ रक्तदात्यांनी रक्तदान…

Read More
Swarajyatimesnews

पाबळमध्ये ‘अजित दादांच्या’ स्मृतींनी पानावलेल्या डोळ्यांनी गहिवरलेल्या हृदयाने ग्रामस्थ भावनिक

प्रफुल्ल शिवले व वंदना पवारांच्या विजयासाठी भावनिक साद! पाबळ (ता. शिरूर) पाबळच्या मातीत आज राजकारण विरघळले आणि उरली ती फक्त आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेली ‘कृतज्ञता’. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे पाबळ येथे आगमन झाले असता, हजारो ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी निर्माण झालेल्या भावूक वातावरणामुळे आगामी निवडणुकीचे पूर्ण चित्रच बदलले…

Read More
error: Content is protected !!