पिंपळे जगताप येथून २८ वर्षीय तरुण बेपत्ता; गणेश शिंगारे यांचा शोध सुरू

Swarajyatimesnews

शिरूर : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील बेंडवस्ती परिसरातून गणेश सखाराम शिंगारे (वय २८) हा तरुण बेपत्ता झाल्याची नोंद शिक्रापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. १० जून २०२६ रोजी रात्री सुमारे १२ वाजता तो घरातून निघून गेला असून, त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नाही.

गणेश शिंगारे हा व्यवसायाने चालक असून, सध्या बेंडवस्ती, पिंपळे जगताप येथे राहत होता. त्याचे मूळ गाव धारूर (ता. केज, जि. बीड) आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता तरुणाची उंची अंदाजे ५ फूट ८ इंच असून रंग सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा उभट व नाक सरळ आहे. त्याच्या डाव्या डोळ्याची पापणी काळ्या रंगाची असून, तो मराठी भाषा बोलतो. बेपत्ता होताना त्याने लाल रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि पायात काळ्या रंगाची चप्पल परिधान केली होती.

या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात मिसिंग रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून गणेश शिंगारे यांचा शोध घेतला जात आहे.गणेश शिंगारे यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास शिक्रापूर पोलिस ठाणे किंवा संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!