Swarajyatinesnews

Breaking News : प्रकाश धारिवाल यांच्या निवडणूक न लढण्याच्या घोषणेने शिरूरच्या राजकारणात भूकंप!

राजकारणात नाही तर समाजकारणात रस शिरूर (प्रतिनिधी) : शिरूरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घोषणा करत शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा, उद्योगपती आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी स्पर्धेत उतरणार नसल्याची घोषणा केली आहे.(Breaking News: Prakash Dhariwal’s announcement not to contest the election causes an earthquake in Shirur politics!) “मला राजकारणात नाही…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर ग्रामपंचायतिचे आदर्श सरपंच रमेश गडदे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिव्यांग व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

मागण्याऐवजी देण्याचा’ अनोखा आदर्श! शिक्रापूरच्या दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायतीसाठी दिली ‘लिफ्ट’ची अनोखी भेट प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर): पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर गावाने सामाजिक औदार्याचा एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे. इतरांकडून सोयीसुविधांची मागणी करण्याऐवजी, येथील दिव्यांग बांधवांनी एकत्र येत स्वतःच्या हक्काच्या निधीतून ग्रामपंचायत इमारतीसाठी ‘लिफ्ट’ बसवण्याची घोषणा करून सर्वांना चकित केले आहे. ‘मागणे’ नाही,…

Read More
Searajyatimesnews

हॉटेल गणेश भुवनच्या आधारवड द्वारकाबाई (नाणी) फडतरे यांचे वृद्धापकाळाने निधन

कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर-हवेली तालुक्यावर शोककळा कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील सुप्रसिद्ध हॉटेल गणेश भुवनच्या संस्थापिका द्वारकाबाई उर्फ नाणी गोपीनाथ फडतरे (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. शांत, संयमी, नेहमी हसतमुख, दुसऱ्यांच्या दुःखात डोळे भरून येणाऱ्या आणि मदतीचा हात देणाऱ्या नाणी या कोरेगाव भिमा…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापुरातील श्रीमंत गणराज मित्र मंडळाचा गणेशोत्सवातून समाजसेवेचा आदर्श

प्रतिनिधी राजाराम गायकवाड  गणेशोत्सव, भक्ती आणि समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम,३०० मोफत चष्मे वाटप, रक्तदान, वृक्षारोपण, कीर्तन , खेळ पैठणीचा आणि दिव्यांगांचा सुरेल ऑर्केस्ट्रा असे कौतुकास्पद कार्य करणारा समाजभान जपणारा मंडळ ठरला शिक्रापूरकरांचा  मानाचा तुरा शिक्रापूर ( ता.शिरूर) युवाशक्ती, सामाजिक जागृती आणि  समाजभान जपणारी अनोखी गणेश भक्ती अशा त्रिवेणी संगम साधणाऱ्या शिक्रापूर येथील श्रीमंत गणराज मित्र…

Read More
Swarajyatimesnews

कोंढापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहिम

प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) : कोंढापुरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा हटवून रस्त्याची स्वच्छता केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना व पाहुण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कोंढापुरीचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर आणि जवळच असलेला पाझर तलाव या परिसरातील…

Read More
Swarajyatimesnews

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत टाळावी – ॲड. प्रिया कोठारी

रांजणगाव गणपती (ता.शिरूर) मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेमध्ये नुकताच विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध ॲड. प्रिया कोठारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत यांसारख्या आजच्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकत विद्यार्थी व पालकांना मोलाचा सल्ला दिला. ॲड. प्रिया कोठारी यांनी…

Read More
Swarajyatimesnews

राष्ट्रीय परिवर्तक परिषदेसाठी मंगेश पोळ यांची  निवड

 माहेरच्या प्रेमाची आणि सेवेची गाथा २५ सप्टेंबर, पुणे: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, सामाजिक शांतता आणि मानवतेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मंगेश पोळ याची गुजराथमधील राष्ट्रीय परिवर्तक परिषद २०२५ साठी निवड झाली आहे. भारतभरातील केवळ ५० निवडक व्यक्तींमध्ये मंगेशचा समावेश झाल्याने त्याचे हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. आईने जीवावर उदार होऊन माहेर या संस्थेमध्ये दाखल…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये ‘पर्यावरणपूरक मंदिर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर: श्रावणी सोमवारच्या पवित्र दिनी, शिक्रापूर गावात एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. विद्यादाम प्रशाला, शिक्रापूर येथील १९८७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत ‘पर्यावरणपूरक मंदिर’ ही मोहीम सुरू केली. या उपक्रमांतर्गत गावातील चार मंदिरांमध्ये पॉलिथीनमुक्त परिसरासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंदिरांचे परिसर स्वच्छ आणि पॉलिथीनमुक्त…

Read More
Swarajyatimesnews

बालरंगभूमी परिषदेच्या नाट्यछटा स्पर्धेत बालकलाकारांचा जल्लोष!

राजाराम गायकवाड जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर): बालरंगभूमी परिषद आणि पिंपरी-चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या कै. सौ. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०२५ मध्ये राज्यातील बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या स्पर्धेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “या स्पर्धांमधून मुलांमधील कलागुणांना वाव मिळतो. शिक्षण क्षेत्रात अशा…

Read More
Swarajyatimesnews

‘शिवाजी महाराजांनी प्रतिकूल काळात स्वराज्य घडवले’ – ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे

राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर ) छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी राज्याची स्थापना केली, तो काळ सोयीचा नव्हता, तर तो अत्यंत प्रतिकूल होता. या प्रतिकूलतेवर मात करत महाराजांनी स्वराज्य घडवले, असे प्रतिपादन ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले. कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी, काल्याचे कीर्तन…

Read More
error: Content is protected !!