
‘कशापायी हट्ट केलास बाळा? लेकीला काय सांगू, मी एकटी कशी जाऊ गावाला?’ – वारीत नातू गमावलेल्या आजीच्या हुंदक्यांनी पंढरीची वाटही हेलावली!
सराटी (ता.इंदापूर) विठुरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या पंढरपूर वारीत एका २० वर्षांच्या तरुणाचा नीरा नदीच्या पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील गोविंद कल्याण फोके असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, यंदाची त्याची पहिलीच वारी आयुष्यातील शेवटची ठरली. मंगळवारी पहाटे सराटीजवळ नीरा नदीत घडलेल्या या घटनेने वारी…