महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी रामेश्वर राठोड; सरचिटणीसपदी राजेंद्र सात्रस बिनविरोध निवड

Swarjyatimesnews

जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध निवड

संपादक उदयकांत ब्राम्हणे

महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी (पंचायत) संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यामध्ये शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड यांची जिल्हाध्यक्षपदी, तर हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र सात्रस यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

शिक्रापूर येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामध्ये राजेंद्र चांदगुडे (मानद अध्यक्ष), रंगनाथ हुजरे (उपाध्यक्ष), जयश्री बेनके (महिला उपाध्यक्षा), बाळासाहेब मतकर (कोषाध्यक्ष), बबन चखाले (कायदे सल्लागार), तुषार साळुंखे (सहसचिव), अमरजा दंडे (लेखापरीक्षक), भिवाजी काळे (प्रसिद्धी प्रमुख), आदित्य शेटे, प्रदीप ढवळे व शिरीष मोरे (संघटक) तसेच ललिता चौधरी (महिला संघटक) यांची निवड झाली.

ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी राज्य संघटक राजेंद्र चांदगुडे, राज्य सहसचिव संजय शिंदे, पुणे विभागीय अध्यक्ष सुखदेव साळुंखे, माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खंडाळे, माजी जिल्हा सरचिटणीस शिरीष मोरे, माजी कोषाध्यक्ष प्रशांत बागडे, श्रीकांत दणाने (पंचायत समिती, बारामती) तसेच विष्णू गाडिलकर (शिरूर) यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत बागडे यांनी केले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संघटनेच्या बळकटीसाठी व विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नव्या कार्यकारिणीकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!