बारामती हादरली! १२वीच्या विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या प्रांगणात खून
बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात एका १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना महाविद्यालयाच्या आवारात घडली असून, यामुळे विद्यार्थी, शिक्षक, आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते. आज सकाळी अकराच्या सुमारास एका विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. हल्ल्यात…