सरपंच-उपसरपंच, तक्रारदार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुन्हा पंचनामा करण्याचे निवेदन शिरूर तहसिलदार , पुणे जिल्हाधिकारी व पोलीस यांना लवरच दिले जाणार असल्याचे अॅड.विजयराज दरेकर व सागर दरेकर यांनी सांगितले.
सणसवाडी (ता.शिरूर) येथील इस्पात कंपनीच्या आवारातील ग्रॉझ बेकर्ट कार्डिंग कंपनीच्या हद्दीत मंगळवारी केलेल्या पंचनाम्यात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. डायनामाईटसारख्या घातक स्फोटकांचा वापर करून बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले होते, परंतु पंचनाम्यात स्फोटासाठी आणि उत्खननासाठी वापरलेली ११ वाहने आणि मशीनरींचा उल्लेख नाही. या त्रुटीमुळे संपूर्ण सणसवाडीतील ग्रामस्थ संतापले असून, पंचनामा पुन्हा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यात तक्रारदार व स्थानिकांनी या सर्व बेकायदा कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्र काढून पूरावे जमा केलेले आहेत. महसूल विभागाला लवकरच ते दिले जाणार आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार, पंचनाम्यात ६ हजार ३२५ ब्रास मुरुमाचा उल्लेख असला तरी, जेसीबी, पोकलेन, हायवा, ट्रॅक्टर, रोलर आणि क्रशर यांसारखी ११ वाहने व मशिनरींचा समावेश केला नाही. पंचनामा करताना या सर्व वाहनांचा समावेश का झाला नाही, याबद्दल स्थानिकांनी शंका उपस्थित केली आहे.
ग्रामस्थांचा संताप आणि महसूल विभागाची प्रतिक्रिया – ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तलाठी गोविंद घोडके यांनी स्पष्ट केले की, पंचनाम्यातून राहिलेली वाहने आणि मशिनरींचा समावेश करून गुरुवारी (ता. ०३) किंवा शुक्रवारी (ता. ०४) नवा पंचनामा तहसीलदार शिरूर यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. परंतु, ग्रामस्थांना ही प्रक्रिया अपुरी वाटत असल्याने त्यांनी पुन्हा एकदा पंचनामा करण्याची जोरदार मागणी केली आहे.
पंचनाम्यातून गहाळ झालेली वाहने- १ ट्रॅक्टर (सुरुंग लावण्यासाठी) ५ पोकलेन, २ हायवा,१ जेसीबी, १ रोलर, १ क्रशर
ही सर्व वाहने उत्खननाच्या ठिकाणी अद्याप उभी असून, त्यांचा पंचनाम्यात समावेश होणे आवश्यक होते. स्थानिकांनी या प्रकरणात स्फोटकांचा बेकायदेशीर वापर झाल्याचा संशय व्यक्त केला असून, फौजदारी स्वरुपाचे गुन्हे घडल्याचेही संकेत दिले आहेत. ग्रामस्थांनी महसूल विभागाला पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊ शकेल.
ग्रामस्थांची पंचनामा पुन्हा करण्याची मागणी – तलाठ्यांनी केलेला पांचानाम्यामध्ये गंभीर त्रुटी असून वाहनांचा उल्लेख नसणे व इतर आवश्यक बाबींचा उल्लेख नसणे या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाकडे धाव घेणार आहोत. केवळ मुरुमाचा पंचनामा करुन संपूर्ण सणसवाडीकरांना शेंडी लावली जात असल्याने या प्रकरणी सरपंच-उपसरपंच व तक्रारदारांच्या उपस्थितीत पुन्हा पंचनामा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून या मागणीचे निवेदन शिरूर तहसिलदार , पुणे जिल्हाधिकारी व पोलीस यांना लवरच दिले जाणार असल्याचे अॅड.विजयराज दरेकर व सागर दरेकर यांनी सांगितले.
इस्पात प्रोफाइल मध्ये असणाऱ्या कामगारांसाठी एकही स्थानिक पुढारी लढला नाही. यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. सातशे कोटी रुपयाची कंपनी शंभर कोटी रुपयात विकणे म्हणजे फार मोठा भ्रष्टाचार यात झाला आहे शेतकऱ्यांकडून कमी पैशात जमिनी खरेदी करून तुमच्या मुलांना नोकरी देतो अशी आमची दाखवली. आणि कंपनी बंद करून स्वस्तात जमिनी लूटने ा पुढार्यांचा धंदा झाला आहे
कामगार कायदा क्षीण झाला आहे
विरोधात बोलतो त्याला थोडीफार पैशाची गुणवंत करून लाखो कामगारांचे नुकसान करणारे कायदे याकडे पुढारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात. हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे. न्यायालयामध्ये राजकीय लोकांना लवकर न्याय मिळतो परंतु कामगारांना न्याय मिळायला 25 वर्षे लागतात हे दुर्दैव आहे