
Category: Uncategorized

बी.जे.एस. महाविद्यालयास ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’
पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी केल्याने निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने बी.जे.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली यांना ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दि.२३ एप्रिल २०२५ रोजी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे ही सभा पार पडली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय…

पुण्याच्या खेड तालुक्यातील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीच्या घराला व ट्रॅक्टरला आज्ञातांकडून पेटवून देण्याचा प्रयत्न..
मांजरेवाडी (धर्म, ता. खेड) मुलीच्या अपहरण अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीचे घर व घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिस व अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे.मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दि १८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास…

शिक्रापूर येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याची उत्साहात सुरुवात
शिक्रापूर (ता. शिरूर) : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या अभियानाचा शुभारंभ शिक्रापूर येथील शासकीय विश्रामगृहात 15 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अश्विन पवार, अजय वाघमोडे, राजेश…

महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे ५२ वे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश पदी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.१४ मेला राष्ट्रपती द्रोपती मुर्मू या गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे जन्म झाला. १९८५ मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत…

कौतुकास्पद! मंथन परीक्षेत पिंपळे जगतापची प्रियल अशोक नाईकनवरे राज्यात सातवी तर पुणे जिल्ह्यात दुसरी
एकाच वेळी तीन परीक्षांमध्ये मिळवले नेत्रदीपक यश पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील विद्यार्थिनीने नेत्रदीपक यश मिळवत राज्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अभिरूप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामीनेशन(एन एस एस ई)) या परीक्षेत राज्यात ११ वी तर मंथन परीक्षेत राज्यात सातवी व जिल्ह्यात दुसरी क्रमांक मिळवून पिंपळे जगताप गावचे नाव राज्य स्तरावर झळकावले असून…

कोरेगाव भिमा येथे श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जयंती पर्यंत शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन
श्रीराम जयंती निमित्त यज्ञाला बसल्या १५१ जोड्या कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील अखिल कोरेगाव भीमा समस्त नागरिकांच्या व युवकांच्या समन्वयातून शिरूर तालुक्यातील व पुणे जिह्यातील ग्रामीण भागात नावाजलेली व भक्तिभाव पूर्ण शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी प्रभू श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या यज्ञाला १५१ जोड्यांच्या हस्ते संपन्न झाला. या…

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी वंदना भुजबळ यांची निवड
शिक्रापूर (ता.शिरूर) गावाच्या उपसरपंच पदी माजी सरपंच आबासाहेब करंजे व बापूसाहेब जकाते यांच्या पॅनलच्या वंदना रमेश भुजबळ यांची निवड झाली. पूजा दिपक भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत वंदना रमेश भुजबळ व शालन अनिल राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला. १७ सदस्य असणाऱ्या शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये मतदान पार पडले.यावेळी झालेल्या…

पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा (डीपीआर) अखेर रद्द करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या या आराखड्यावर मोठ्या प्रमाणात हरकती आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या आराखड्याची प्रक्रिया पुन्हा राबवण्याचे आदेश पीएमआरडीएला देण्यात आले आहेत. २०१५ पासून सुरू असलेली प्रक्रिया…

सणसवाडीतील वसेवाडी शाळेचा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत डंका
सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) शाळेतील ३८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तर शंभर टक्के निकालासह उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून…

कोरेगाव भीमा येथील गफूरभाई इनामदार यांचे अल्पशा आजाराने निधन
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील गफूरभाई इनामदार (वय ८० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा गावातील विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नेहमी सहभाग असायचा. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य समीर इनामदार, व शकील इनामदार यांचे वडील तर उद्योजक अमीर इनामदार, माजी ग्राम पंचायत सदस्य सिराज इनामदार यांचे बंधू तर डॉ.अझर इनामदार यांचे चुलते,…