शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा, नंतर मारून टाकावं यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे संबधित शाळेने प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोठा वाद उद्भवला.
मुख्याध्यापकसह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल – दौंडच्या इंग्रजी शाळेमधील धक्कादायक प्रकार उघड आलाय. शाळेतीलच विद्यार्थिनीला मारून टाकण्याची विद्यार्थ्यांकडून सुपारी देण्यात आली होती. शाळेची बदनामी होऊ नये यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पण अल्पवयीन विद्यार्थीनीची बदनामी केल्याप्रकरणी मुख्याध्यापकसह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्याला दिली १०० रुपयाची सुपारी – दौंड मधील इंग्रजी शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने पालकाची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती विद्यार्थीनीने शिक्षकांना सांगितली होती. खोट्या सहीची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा मनात राग धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थीनीवर आधी बलात्कार करावा नंतर तिचा खून करावा यासाठी १०० रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शाळेचा हलगर्जीपणा – सादर प्रकरणी मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलाची बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचं सांगत तिला मानसिक त्रास देत तिचं शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापक डीमोलो जोवीन, वर्गशिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.