दिनांक ४ फेब्रुवारी – सणसवाडी (ता.शिरूर) आमदार अॅड.निरंजन डावखरे प्रतिष्ठानचे वतीने तसेच भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने पुढाकाराने आयोजित येथील वीस शासकीय योजनांच्या दोन दिवसीय मोफत शिबीरात तब्बल दिड हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून यामध्ये आधार दुरुस्ती, बाल आधार, ई-श्रम कार्ड तसेच पोस्टाच्या जनरल इन्शुरन्स विम्यासाठी कामगार वर्गाची मोठी गर्दी राहिली. तब्बल अडीच कोटींच्या पोस्टाच्या मेडीक्लेम विमा पॉलिसी करण्यात आल्याची माहिती मुंबई पोस्टल सर्व्हीसेसचे संचालक डॉ.अभिषेक इचके व शिबीर आयोजक आमदार निरंजन डावखरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल साठे यांनी दिली.
मुंबई पोस्टल सर्व्हीसेसचे संचालक डॉ.अभिषेक इचके यांच्या पुढाकाराने सणसवाडी (ता.शिरूर) येथे पोस्टाच्या २० विविध शासकीय योजनांचे दोन दिवसीय मोफत शिबीर पार पडले. येथील मयुरी रेसिडेन्सी प्रांगणात आमदार ज्ञानेश्वर कटके, पुण्याचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, आयकर उपायुक्त डॉ.वसंत राजपुत, पोस्टाचे उपायुक्त योगेश वीर आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबीरात बाल आधार कार्ड, आधार दुरुस्ती, पोस्ट वैद्यकीय विमा, सुकन्या समृध्दी योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना, आयुष्यमान भारत योजना, असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम नोंदणी आदींसह एकुण २० सेवा यावेळी मोफत उपलब्ध करुन दिल्या होत्या. यावेळी उपसरपंच राजेंद्र दरेकर यांनी गावातील १५ मुली संपूर्ण शिक्षणासाठी यावेळी दत्तक घेत सामाजिक उत्तरदायित्व जपले.
या कार्यक्रमाबरोबरच शिवम मंगल कार्यालयात गावातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत करीअर मार्गदर्शन मेळाव्यात डॉ.अभिजित इचके, आयपीएस निखील पिंगळे, आयआरएस डॉ.वसंत राजपूत आदींनी ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोठ्या करीअर संधींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वरील मान्यवरांसह सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, पि डी सी सी संचालक प्रदीप कंद, राहूल पाचर्णे, आनंदराव हरगुडे, आकाश दरेकर, भाजपचे बाबा दरेकर, वैभव यादव, उद्योजक व माजी सरपंच राहूल गव्हाणे, जयेश शिंदे, आशा दरेकर, शशिकला सातपूते, अॅड.विजयराज दरेकर, संभाजी साठे, रामदास दरेकर, विकास दरेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोस्टाच्या सेवांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन एएसएन ईसेवा केंद्राचे सुधीर मुळे यांनी केले. दरम्यान मोफत शिबीर यशस्वी करुन दाखविल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल साठे यांचा विशेष सत्कार यावेळी ग्रामस्थांनी केला.