शिक्रापूर (ता. शिरूर) दिवाळीच्या मंगल पर्वावर शिक्रापूर येथील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याचा आदर्श उपक्रम कर्तव्य फाउंडेशनतर्फे यंदाही उत्साहात पार पडला. आदर्श सरपंच रमेश गडदे व कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा गडदे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उपस्थित पत्रकारांना मिठाई, पेन, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे पत्रकारांच्या कार्याला मान्यता देत त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
कर्तव्य फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहून आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच नवरात्र व गणेश उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करते. यावेळी संतोष काळे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे आणि उद्दिष्टांचे प्रास्ताविक मांडले.
कार्यक्रमात नागनाथ शिंगाडे, देशमुख सर, एन. बी. मुल्ला सर, राजाराम गायकवाड, शेरखान शेख, उदयकांत ब्राम्हणे, घनश्याम तोडकर, संतोष काळे, निलेश जगताप आदी पत्रकार संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली. दीपावलीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्व पत्रकार बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. सत्यमेव जयते हे तत्व फक्त पत्रकारच अमलात आणू शकतात त्यांच्या या कार्यास सलाम. आजची समाज व्यवस्था शांतीप्रियरित्या टिकवून ठेवायचे असेल तर पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे.
धन्यवाद.