पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना तिसरे अपत्य असल्यामुळे आणि लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी ही कारवाई केली.
दांगट यांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले. शासनाच्या १ जुलै २००५ च्या लहान कुटुंब नियमांनुसार, महापालिकेच्या पदांवर नियुक्तीसाठी दोन अपत्यांपर्यंतची अट आहे. फेब्रुवारी २०२५ अखेरीस निवृत्त होण्यापूर्वीच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
दांगट यांनी बडतर्फीच्या निर्णयाला अन्यायकारक म्हणत, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.