
Category: स्थानिक वार्ता

टाकळी हाजीच्या शिक्षकांचा अनोखा विक्रम: एकाचवेळी सहा शिक्षक मुख्याध्यापकपदी विराजमान
टाकळी हाजी (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या छोट्या गावातील सहा आदर्श शिक्षकांना नुकतीच पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण शिरूर तालुक्याचा शैक्षणिक मान उंचावला असून, शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचे आणि निस्सीम योगदानाचे हे प्रतीक आहे. शिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा केवळ वाढवला नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,…

राष्ट्रीय परिवर्तक परिषदेसाठी मंगेश पोळ यांची निवड
माहेरच्या प्रेमाची आणि सेवेची गाथा २५ सप्टेंबर, पुणे: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, सामाजिक शांतता आणि मानवतेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मंगेश पोळ याची गुजराथमधील राष्ट्रीय परिवर्तक परिषद २०२५ साठी निवड झाली आहे. भारतभरातील केवळ ५० निवडक व्यक्तींमध्ये मंगेशचा समावेश झाल्याने त्याचे हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. आईने जीवावर उदार होऊन माहेर या संस्थेमध्ये दाखल…

गणेशोत्सवासाठी पुण्यात ‘गणेश दर्शन सहली’ चे आयोजन
पुणे, दि. २८ ऑगस्ट पुणे: यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पर्यटन संचालनालय, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. आणि पुणे महानगरपालिका यांनी मिळून देशी-विदेशी पर्यटकांसाठी विशेष ‘गणेश दर्शन सहल’ आयोजित केली आहे. या सहलीमध्ये पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत १ सप्टेंबर रोजी ६० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिक…

पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा युवराज पाटील यांनी स्वीकारला पदभार
दि. २ऑगस्ट : पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यापूर्वी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय,पुणे तर अकोला, वाशिम,सातारा,लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील …

सणसवाडीतील (वसेवाडी) जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींनी साकारली श्री गणेशाची अद्भुत कलाकृती
सणसवाडी (ता. शिरूर): वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर बुद्धीची देवता श्री गणेशाची सुंदर कलाकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमात तब्बल २१५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. गणेशोत्सवाच्या पावन पार्श्वभूमीवर साकारलेली ही कलाकृती समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ तिचं कौतुक करत आहेत. गणेशमूर्तीचे प्रत्येक अंग मुलांनी बारकाईने…

कोरेगाव भीमाच्या सानवी मोटेची राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड
पुणे: ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या पुणे जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ९५४ कोरेगाव पुनर्वसनची विद्यार्थिनी कुमारी सानवी अतुल मोटे हिने लक्षवेधी यश मिळवले आहे. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत, सानवीची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने सादर केलेल्या ‘छावा’ या ऐतिहासिक नाट्यछटेला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. सानवी मोटेचे…

कोरेगाव भीमा येथील जुने उद्योजक हरिभाऊ ढेरंगे यांचे निधन
कोरेगाव भीमा: येथील जुन्या जाणत्या पिढीतील आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असणारे हरिभाऊ दौलती ढेरंगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. लिंब चौकातील हरिभाऊ ढेरंगे हे पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लाकूड वखारीचा व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कोंबड खत व शेणखत पुरवण्याचा व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि आदर्शवत पद्धतीने उभा केला होता. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना…

सन्मान कोरेगाव भीमाच्या सुपुत्राचा… पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळालेल्या संतोष घावटे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गावातीलच नव्हे तर संपूर्ण परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेले सुपुत्र संतोष घावटे यांनी यशाचा नवा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावत त्यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती मिळाली असून, त्यांच्या या यशामुळे कोरेगाव भीमा ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या यशानिमित्त ग्रामपंचायतीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. संतोष घावटे…

कोरेगाव भीमाच्या कस्तुरी मुसमाडेची नासा भेटीसाठी निवड : शिरूर तालुक्याचा अभिमान
नेत्रदिपक यशामुळे कस्तुरी मुसमाडेची शालेय व्यवस्थापन समिती व गावाच्यावतीने काढण्यात आली सवाद्य मिरवणूक दिनांक २२ ऑगस्ट कोरेगाव भीमा (ता. शिरूर ) पुणे जिल्ह्यातील तब्बल तेरा हजार विद्यार्थ्यांमधून शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील कस्तुरी मुसमाडे हिने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीत यश मिळविण्याबरोबरच अमेरिका मधील नासाच्या भेटीसाठी जिल्हा परिषदेने घेतलेल्या परीक्षेमधून निवड…

संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत हाच यशाचा मंत्र – शंकर भूमकर
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे थाटात उद्घाटन; नवीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण लोणीकंद (ता. हवेली): “संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत – हाच यशाचा खरा मंत्र आहे,” असा मोलाचा संदेश देत श्री रामचंद्र अभियांत्रिकी (डिप्लोमा/पॉलिटेक्निक) महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे उद्घाटन थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न…