सुंदरबाई पवार गौरव पुरस्कार सोहळ्यात शिरूर विविध मान्यवरांचा सन्मान
जातेगाव (ता. शिरूर)”ग्रामीण भागातील माता-भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा कायमस्वरूपी उतरवून त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी घरोघरी पोहोचवणे हाच माझा सेवा धर्म आहे,” असे ‘आदर्श उद्योगपती कै. अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट उद्योजक २०२४’ पुरस्काराने गौरविण्यात आलेले आदर्श उद्योजक दिपक जयसिंग भिवरे यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, निवृत्त आयुक्त कांतीलाल उमाप, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिरूर तालुक्यातील भूमिपुत्र दीपक भिवरे यांनी आपल्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण केला असून त्यांच्या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सुंदरबाई पवार गौरव पुरस्कार आयोजक कात्रज दूध संघाच्या माजी अध्यक्ष केशरताई पवार, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार,बालाजी प्रतिष्ठान व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिवराव पवार , कृषीनिष्ठ शेतकरी सुरेश पवार यांचे आभार मानत या पुरस्काराने अत्यंत प्रेरणा मिळाली असून प्रामाणिक, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करण्याचा व जनतेच्या आशीर्वादाचा व ग्रामीण भागातील माता माऊलींचा आशीर्वाद असून यापुढे काम करण्यासाठी सर्व पुरस्कारार्थिंना खूप मोठी ऊर्जा मिळाली आहे.
सामान्य कुटुंबातून उदयास आलेले दिपक भिवरे –वाफगाव येथील रयत शिक्षण संस्थेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या दीपक भिवरे यांनी न्हावरे येथील मल्लिकार्जुन विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेत त्यांनी स्वतःचे करिअर घडवण्याचा प्रवास सुरू केला. कोणत्याही मोठ्या औद्योगिक किंवा राजकीय पार्श्वभूमीशिवाय, त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत करत उद्योगजगतामध्ये आपले वेगळेपण सिद्ध केले.
सरकारी पाणीपुरवठा विभागाकडे नोंदणी करत त्यांनी गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत कामावर भर दिला. जल जीवन मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ६० टक्के कामे आणि पुणे जिल्ह्यातील अनेक महत्वाची प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी आपल्या नावाभोवती विश्वासाचे वलय निर्माण केले आहे. दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या त्यांच्या तत्त्वांमुळे एम/एस दीपक जे. भिवरे हे नाव गुणवत्तेचे प्रतीक बनले आहे.
सन्मानाने निर्माण झालेली प्रेरणा – ग्रामीण भागातील जनतेच्या सेवा करताना मिळणारे आशीर्वाद आणि समाधान हेच माझे खरे यश आहे. आई-वडिलांचे संस्कार, कुटुंबाची भक्कम साथ, आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे मी आज या टप्प्यावर पोहोचलो आहे. अजून खूप मोठी कामे शिल्लक आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी पिण्याचे पाणी पोहोचवणे हीच माझी खरी ईश्वरपूजा आहे,” असे दीपक भिवरे यांनी सांगितले.
प्रेरणा आणि आदर्श निर्माण करणारे कार्य – दीपक भिवरे यांच्या कार्याने ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. या पुरस्कारामुळे त्यांना नव्या उमेदीने काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे कार्य हे सर्वसामान्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
आदर्श उद्योगपती कै. अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट उद्योजक २०२४ पुरस्कार मिळाल्याने अत्यंत आनंद होत आहे.ग्रामीण भागातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचे काम केल्याने त्या लोकांचे मोठे आशीर्वाद मिळत असून सर्वसामान्य जनतेची आपल्या प्रामाणिक कामातून सेवा हाच आमचा परमेश्वर असून आई वडील यांच्या संस्काराने तसेच सर्वसामान्य व एकत्रित कुटुंबाच्या चांगल्या व भक्कम साथीने इथपर्यंत पोचलो असून आणखी खूप काम शिल्लक असून ग्रामीण भागातील माता भगिनिंच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवून त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी घरोघरी उपलब्ध करून देणे हाच माणूसकितील सेवा धर्म पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न कामातून करणार आहे.- दिपक जयसिंग भिवरे