
टाकळी हाजीच्या शिक्षकांचा अनोखा विक्रम: एकाचवेळी सहा शिक्षक मुख्याध्यापकपदी विराजमान
टाकळी हाजी (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या छोट्या गावातील सहा आदर्श शिक्षकांना नुकतीच पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण शिरूर तालुक्याचा शैक्षणिक मान उंचावला असून, शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचे आणि निस्सीम योगदानाचे हे प्रतीक आहे. शिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा केवळ वाढवला नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,…