सदर प्रकरणी पोलीस तपासाची ग्रामस्थांची मागणी
सणसवाडी (ता. शिरूर) येथील इस्पात प्रोफाईल कंपनीच्या हद्दीत असलेल्या १० एकरांमध्ये चाललेल्या बेकर्ट कार्डिंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरला आहे. या स्फोटांमध्ये डायनामाईटसारख्या वापर होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने तात्काळ हस्तक्षेप करत स्फोटकांचे काम थांबवले आहे.
शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या च्या आदेशानुसार तलाठी गोविंद घोडके यांनी पंचनामा केला. २५० गुंठ्यांच्या क्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन व स्फोटकांचा वापर केल्याचे . याबाबत स्थानिकांनी मागील काही दिवसांपासून तक्रारी केल्या होत्या. मात्र कंपनीने दखल न घेतल्याने, सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी उपसरपंच सागर दरेकर, अॅड. विजयराज दरेकर, ग्राम पंचायत सदस्य व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी थेट तहसीलदारांकडे धाव घेतली.
बेकायदेशीर स्फोट आणि उत्खनन – गट क्रमांक ९९१, ९९२, ९९३, ९९४/२अ, ९९५, ९९६, ९९७, ९९८, १००१, १००२, १००३, १००४ मधील प्लॉट नं. ५, ५अ, ५ब मध्ये डायनामाईटचा वापर करत औद्योगिक वसाहतीत धोकादायक ब्लास्टिंग सुरू होते. महसूल विभागाच्या सांगण्यानुसार, या कामास कुठलीही परवानगी नव्हती, तरीही काम सुरूच होते. ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर महसूल विभागाने (ता. ०१ऑक्टोंबर) या सर्व अवैध उत्खननाचे पंचनामा करून काम थांबवले.
कंपनीकडून प्रतिसाद नाही – ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे अहवाल पाठवला आहे. कंपनीचे संचालक पुनित विज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
पोलिस तपासाची मागणी – ग्रामपंचायतीने आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात पोलिस तपासाची मागणी केली आहे. स्थानिक तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या स्फोटकांमध्ये घातक रसायने वापरली गेल्याचा संशय आहे, ज्यामुळे हे प्रकरण फौजदारी स्वरुपाचे असू शकते.
सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी उपसरपंच सागर दरेकर, अॅड. विजयराज दरेकर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या अवैध उत्खननाविरोधात कडक भूमिका घेतली आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर आता पोलिस तपासाची मागणी करत, पुढील कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात
वरील कंपनीच्या स्फोटक व गंभीर उत्खननाच्या बाबतीत आम्ही कंपनीत जाऊन समक्ष सांगूनही आलो आहे. मात्र, कुठलीच दखल न देता हे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. आम्हाला तर अशी माहिती मिळाली की, कंपनीच्या आवारात सुरू असलेल्या या कामाला महसूल विभागाची तर परवानगी नाहीच, शिवाय कंपनीनेही चाललेल्या कामाला परवानगी दिलेली नाही. पर्यायाने हा प्रकार गंभीर आहे, असे सणसवाडीचे उपसरपंच राजू दरेकर, सागर दरेकर, रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष ॲड. विजयराज दरेकर यांनी सांगितले.
वरील कामात कुणाचीच परवानगी घेतल्याचे सद्यःस्थितीत आढळत नाही. मात्र, बेकायदा उत्खनन हा मात्र, बेकायदा उत्खनन हा विषय जसा महसुलाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांकडे पंचनामा पाठविलेला आहे. मात्र, स्थानिक तक्रारदारांकडून आता स्फोटकांसाठी काही घातक रसायन वापरल्याचे पुढे येत आहे. सदर प्रकार पोलिस तपासाचा भाग असून फौजदारी स्वरूपाचे हे उत्खनन होऊन या उत्खननाचा गंभीर गुन्ह्याच्या दिशेने प्रवास असू शकतो. – गोविंद घोडके, तलाठी, सणसवाडी (ता. शिरूर)
इस्पात प्रोफाईल कामगारांचा हिशेब न देता चालू केलेली ही बेकायदा कंपनी आहे. यामध्ये बेकायदेशीरपणे काम चालू असेल या कंपनीला ाजकीय पुढार्यांचा वरदहस्त असणार आहे तो जनतेपुढे पत्रकारांनी व्यवस्थित आणावा. सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही कारण भ्रष्टाचारांनी मिळवलेल्या पैशापुढे त्यांची काही चालत नाही. तेव्हा या कंपनीची पूर्णपणे दखल पत्रकारांनी घ्यावी.