इंस्टावर मुलाच्या नावे फेक अकाउंट बनुवून मैत्रिणीची केली चेष्टा…मुलीने घेतला गळफास

स्वराज्य टाइम्स

इन्स्टाग्रामवर मुलाच्या नावानं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची चेष्ठा करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण तिच्या या चेष्ठेमुळं संबंधित मैत्रिणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.यामुळं सोशल मीडियावरुन सुरु असलेल्या खेळात एकाचा जीव गेला आहे.

साताऱ्यात ही घटना घडली आहे.एका मुलीनं मनिष नावानं इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केलं आणि या अकाऊंटवरुन आपल्या मैत्रिणीला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फ्रेन्ड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. यानंतर फसवली गेलेली तरुणी इन्स्टावर मैत्री झालेल्या या खोट्या मनिष नावाच्या मुलाच्या प्रेमातच पडली. यावेळी ती वारंवार मनिषला भेटण्याचा आग्रह करत होती.प्रेमात पडल्यानंतर मनीषला भेटण्यासाठी मैत्रीण आग्रह करू लागल्याने बनावट खाते तयार करणाऱ्या युवतीची पंचाईत झाली. भीतीपोटी तिने केले.पण यामुळं मनिषचं अकाऊंट चालवणारी तिची मैत्रीण गोंधळली आणि हा खेळ थांबवण्यासाठी आणि यापासून कायमची सुटका करुन घेण्यासाठी आणखी एक शिवम पाटील नावाने दुसरे बनावट खाते सुरु केलं आणि त्यावरुन मनीषच्या खात्यावरून शिवम पाटील यांनी संबंधित मुलीला आपण मनीषचा वडील असल्याचे सांगून तो मृत झाला असल्याचे ‘इन्स्टाग्राम’वरूनच सांगितले.मनिष मरणं पावल्याचं तिला सांगितलं तसंच रुग्णालयातील खोटे फोटोही तिला दाखवले. यामुळं धक्का बसलेल्या या २४ वर्षीय तरुणीनं नैराश्यातून गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं.

वाठार पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी चौकशी सुरु असताना हे लक्षात आलं की, मुलाच्या नावाचं जे युजरनेम होतं आणि इतरही काही चार-पाच युजरनेम होते ते एकाच व्यक्तीकडून वापरलं जात होतं. विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मैत्रिणीकडूनच ही सर्व युजरनेम वापरली जात होती. अशा प्रकारे मुलाच्या नावानं या मुलीनं आपल्या मैत्रिणीला फसवलं. एक प्रकारे तिला इमोशनली ब्लॅकमेल केलं. यामुळं संबधित तरुणी डिप्रेशनमध्ये गेली आणि तीनं हे गंभीर पाऊल उचललं. त्यामुळं यामध्ये एक जीव गेलेला आहे.

सातारा सायबर पोलीस व सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांनी ‘इन्स्टाग्राम’वरून या संदर्भातील माहिती मागवली. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या संशयित युवतीला पोलिसांनी अटक केली.पोलीस अधीक्षक समीर शेख , अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सातव, भोसले, पोलीस कर्मचारी चव्हाण, देशमुख , इथापे यांच्यासह सातारा ‘सायबर टीम’ने ही घटना उघडकीस आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!