Swarajyatimesnews

हजारो पणत्यांनी उजळला पेशवे घाट; फुलगावच्या ऐतिहासिक वैभवाला दीपोत्सवाची झळाळी!

पाण्यात उमटले हजारो दिव्यांचे मनमोहक प्रतिबिंब; जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे यांच्या माध्यमातून दीपप्रज्वलन, कमानी घाट संवर्धन समितीचा पुढाकार अन् ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग! फुलगाव (ता. हवेली) हजारो पणत्यांचा लखलखता प्रकाश… ऐतिहासिक कमानीचे उजळलेले रूप… पाण्यावर उमटणारी दीपमाळेची मनोहारी प्रतिबिंबे आणि या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार झालेले शेकडो ग्रामस्थ… अशा नेत्रदीपक वातावरणात फुलगाव येथील ऐतिहासिक पेशवे घाटावर…

Read More
Swarajyatimesnews

मलठणमध्ये मध्यरात्री घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण; चुलतीचेही दागिने लुटले!

चार मुखवटाधारी चोरट्यांचा धुमाकूळ; सुमारे १ लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास उदयकांत ब्राम्हणे शिरूर : शिरूर तालुक्यातील मलठण येथील दंडवतेदरा परिसरात मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या चुलतीला मारहाण करत सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना घडली. ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण…

Read More
Swarajyatimesnews

ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी रविंद्र गोसावी यांची बिनविरोध निवड!

सभासदांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासह पारदर्शक कारभार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणार उदयकांत ब्राम्हणे पुणे : ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या चळवळीत दीर्घकाळ सक्रिय राहून कर्मचारी वर्गाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे माजी मानद अध्यक्ष तथा खेडचे माजी सचिव रविंद्र चंद्रकांत गोसावी यांची पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी (व्हाईस चेअरमन) बिनविरोध निवड करण्यात…

Read More
Swarajyatimesnews

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेसाठी धामारीकर सरसावले; ग्रामस्थ-शिक्षकांकडून देणगीचा वर्षाव!

‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘मिशन ५३’ला लोकसहभागाचे बळ उदयकांत ब्राम्हणे धामारी (ता. शिरूर) : गावातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण गावातच मिळावे, या उद्देशाने धामारीकरांनी शाळा विकासासाठी एकजूट दाखवली आहे. ‘घरापेक्षा शाळा सुंदर असावी’ हा विचार पुढे ठेवत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ अभियान आणि मिशन ५३ ला ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त…

Read More
Swarajyatimesnews

प्रफुल्लित ज्ञानमंदिर अभियानाला शिक्षकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

शिक्षकांकडून ११ हजार १११ रुपयांचा धनादेश; ‘माझी शाळा, माझा अभिमान’चा नारा उदयकांत ब्राम्हणे केंदूर-पाबळ गटातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा उंचावून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ अभियानाला शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत करंदी येथील केंद्रशाळेच्या प्रांगणात करंदी परिसरातील…

Read More
Swarajyatimesnews

ठिकाण बदलले, राज्य बदलले, हरियाणात लपले; पण शिक्रापूर पोलिसांनी शोधून काढले!

डिंग्रजवाडीतील पाच लाखांचे सर्व्हे मशिन चोरीप्रकरणी दोघांना अटक; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तांत्रिक तपासाच्या जोरावर आंतरराज्यीय कारवाई उदयकांत ब्राम्हणे शिक्रापूर (ता. शिरूर) चोरी केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आरोपींनी राज्य बदलले, ठिकाण बदलले आणि हरियाणात जाऊन आश्रय घेतला; मात्र शिक्रापूर पोलिसांची तपासाची चक्रे थांबली नाहीत. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर अखेर आरोपींचा…

Read More
Swarajyatimesnews

एका जिद्दी संकल्पनेतून ५३ शाळांच्या परिवर्तनाची मुहूर्तमेढ; प्रफुल्ल शिवले यांच्या ‘मिशन-५३’ची जिल्हा परिषदेकडून दखल!

तीन महिन्यांत ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास; अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओ ५३ शाळांना देणार भेटी; सर्वसाधारण सभेत अभियानाच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव उदयकांत ब्राम्हणे  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि जागतिक स्तरावरील शिक्षणाची संधी मिळावी, या ध्यासातून जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी पाबळ-केंदूर गटात सुरू केलेल्या ‘मिशन-५३’ची आता पुणे जिल्हा परिषदेनेही विशेष दखल घेतली आहे….

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुकमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा; एक हजार लिटर रसायन जप्त

पोलिसांची चाहूल लागताच संशयित उसाच्या शेतात पसार; ३० हजारांचा मुद्देमाल शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे अवैध गावठी दारू निर्मितीचा प्रकार उघडकीस आला आहे. म्हाळण ओढ्याजवळ काटेरी झुडपांच्या आड सुरू असलेल्या कथित हातभट्टीवर शिरूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे एक हजार लिटर कच्चे रसायन आढळले असून, त्याची किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादी जबाबात नमूद…

Read More
Swarajyatimesnews

‘नटसम्राट’ नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; अभिनयाचा बुलंद आवाज कायमचा शांत!

गोव्यातील निवासस्थानी पहाटे प्रकृती बिघडली; ४५ मिनिटे CPR, तरीही जीव वाचवता आला नाही — ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास शिरूर मटा वृत्तसेवा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अस्सल अभिनयाने, भारदस्त संवादफेकीने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे गोव्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पणजीजवळील दोना पावला…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीत दुर्गामातेच्या भक्तीचा जागर; ‘होम मिनिस्टर’सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाचा भव्य सोहळा; महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, स्वयंसेवक व बॅरिकेडिंगची विशेष व्यवस्था उदयकांत ब्राम्हणे  सणसवाडी (ता. शिरूर) येथील मयूरनगर परिसरात दुर्गामातेच्या भक्तीमय जागरासह नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण ठरणाऱ्या ‘शाब्बास होम मिनिस्टर…

Read More
error: Content is protected !!