संत सावता माळी यांचे सोलापूर जिल्ह्यातील जन्मगाव अरणगाव ते पुणे जिल्ह्यातील धानोरे शेरीवस्ती येथे २१० किलोमीटर आणली मशाल
धानोरे (ता. शिरूर) येथील शेरी वस्ती श्री. संत सावतामाळी तरुण मंडळ शेरीवस्ती आयोजित श्री संत सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य ज्योत सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री संत सावतामाळी तरुण मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी श्री. संत सावतामाळी महाराज यांचे समाधी स्थळ सोलापूर जिल्ह्यातील अरणगाव ते धानोरे शेरीवस्ती येथे आशी २१० किलोमीटर अंतरावरून मोठ्या भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात आणलेल्या ज्योतीचे पूजन करण्यात आले.
सायंकाळी ह.भ.प.कुंभार महाराज यांची प्रवचन रुपी सेवा संपन्न झाल्यानंतर धानोरे भजनी मंडळ यांनी भजन सादर करून, महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी धानोरे-दरेकरवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब भोसुरे यांच्या हस्ते भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील स्वप्निल झगडे,माजी सरपंच बाळासाहेब तनपुरे ,दिंडीचे अध्यक्ष रमेश ढमढेरे,माजी उपसरपंच संदीप कामठे,खंडू ढोले,माऊली झगडे, गोविंद झगडे,महेंद्र झगडे, उमेश झगडे, शंकर झगडे,मोहन कामठे,विजय डफळे, ह.भ.प. निवृत्ती कामठे, ह.भ.प आत्माराम देवधरे व महिला माता भगिनी व सर्व ग्रामस्थ धानोरे शेरीवस्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.