
कोरेगाव भीमाच्या सानवी मोटेची राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड
पुणे: ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या पुणे जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ९५४ कोरेगाव पुनर्वसनची विद्यार्थिनी कुमारी सानवी अतुल मोटे हिने लक्षवेधी यश मिळवले आहे. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत, सानवीची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने सादर केलेल्या ‘छावा’ या ऐतिहासिक नाट्यछटेला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. सानवी मोटेचे…