
निलंबित पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
अंबाजोगाई – सेवेतून निलंबित असलेले माजी पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (सोमवारी) रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे. परळी तालुक्यातील नागदरा हे मूळ गाव असलेले सुनील नागरगोजे हे अनेक वर्षांपासून अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते. परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत त्यांनी पोलिस सेवेत…