Swarajyatimesnews

शिरूर येथील गंगावणे हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत ठोकल्या बेड्या

शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपींना पकडले उदयकांत ब्राम्हणे शिरूर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबार करून हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांची हत्या करण्यात आली होती. या गंभीर हत्याकांडाचा तपास करत शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या ४८ तासांत तिन्ही संशयित आरोपींना सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून जेरबंद केले….

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर पोलिसांकडून १३ लाख ६० हजारांच्या ३२ दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात

गुन्हे, अपघात व बेवारस स्थितीत सापडलेल्या वाहनांचा शोध; मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन  प्रतिनिधि राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता.शिरूर) गुन्हे, अपघात तसेच बेवारस स्थितीत सापडून शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात दीर्घकाळ पडून असलेल्या वाहनांपैकी ३२ दुचाकींचा शोध घेऊन त्या त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १३ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती…

Read More
Swarajyatimesnews

अमरावतीतून घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद २४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिक्रापूर-शिरूरमधील तीन घरफोड्या उघड; १६ तोळे सोन्यासह दुचाकी जप्त स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर : महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून अटक केली. दीपक भीमराव दांडे (वय २५, रा. घुगरी, ता. भैंसदेही, जि. बैतूल, मध्य प्रदेश; सध्या रा. कविठा, ता. अचलपूर, जि. अमरावती)…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे कुरियरचे ऑफिस फोडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याची सतर्कता अन् चोरांची तारांबळ; रिक्षा सोडून पळाले

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा सकाळची वेळ… शांतता… आणि कुरिअर कंपनीत शिरलेले तीन सराईत चोरटे! मात्र एका सतर्क कर्मचाऱ्याच्या हुशारीमुळे लाखो रुपयांचा ऐवज वाचला असून चोरांना आपली रिक्षा घटनास्थळीच सोडून पळ काढावा लागला. कोरेगाव भीमा येथील बालाजी कॉम्पलेक्समध्ये सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी ही थरारक घटना घडली. सीसीटीव्ही तोडले, लॉकर उघडले… पण! – ‘सँडोफॅक्स टेक्नॉलॉजी लि.’ या कुरिअर…

Read More
Swarajyatimesnews

२ कोटींचा दंड टाळायचा असेल तर १० लाख द्या! कथित लाच मागणी प्रकरणी तलाठी आश्विनी कोकाटे दुसऱ्यांदा एसीबीच्या जाळ्यात

२०२१ ते २०२६ : कथित लाच मागणी ₹२० हजारांवरून ₹१० लाखांवर वाटचाल ; लाचेच्या रक्कमेत तब्बल ५० पट वाढ पुणे, दि. ४ :पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पाच्या खोदकामाच्या पंचनाम्याशी संबंधित प्रकरण दडपण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी अश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७) व कोतवाल महेश मधुकर मुंडे (वय…

Read More
Swarajyatimesnews

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ भाविक लक्ष्मण भाऊसाहेब भुजबळ यांचे दुःखद निधन

प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर, ता. ४ : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ भाविक लक्ष्मण भाऊसाहेब भुजबळ (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायासह शिक्रापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते चे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक रमेश भुजबळ यांचे…

Read More
Swarajyatimesnews

आषाढी वारीच्या भक्तिरंगात विशेष विद्यार्थ्यांची पालखी; वृक्षदिंडीने पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

शिक्रापूर प्रतिनिधी : राजाराम गायकवाड  आषाढी वारीचे औचित्य साधत श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी मतिमंद विद्यालय, मैत्री गोल्ड सोसायटी, शिक्रापूर येथे विशेष विद्यार्थ्यांनी साकारलेला पालखी सोहळा आणि वृक्षदिंडी परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीच्या पूजनाने…

Read More
Swarajyatimesnews

पिंपळसुटीत बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पहाटे गोठ्याबाहेर झोपलेल्या भाग्यश्री वारे हिच्यावर बिबट्याची झडप; शोधमोहीमेसाठी पिंजरे, ड्रोन आणि कॅमेरा ट्रॅप तैनात स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी परिसरात बुधवारी (२२ जुलै) पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत मुलीचे नाव भाग्यश्री संदीप वारे (वय ५) असून ती ऊसतोड कामगाराची मुलगी होती. मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही…

Read More
Swarajyatimesnews

बीजेएस महाविद्यालयात दुर्मीळ मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन, इतिहासाच्या अमूल्य ठेव्याची विद्यार्थ्यांना पर्वणी

२३ ते २४ जुलैदरम्यान आयोजन; सांस्कृतिक कार्य विभाग पुराभिलेख संचालनालय व भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम  स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा वाघोली (ता.हवेली) भारतीय इतिहास, प्रशासन आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या दुर्मीळ मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन बीजेएस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे २३ व २४ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे भीषण अपघात दुचाकीस्वाराचा मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

अपघात ग्रस्तांना  माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उद्योजक सुनील गव्हाणे,  संजय सोनवणे, किरण गव्हाणे, योगेश भंडारे, प्रविण गव्हाणे यांनी तातडीने मोलाची मदत केली. स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा–पिंपळे जगताप मार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी स्प्लेंडर मोटारसायकलवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे….

Read More
error: Content is protected !!