
धक्कादायक ! आळंदीत सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू
आळंदीतील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय ३२) यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गावात पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या स्वामी यांना सापाने दंश केला. दंशानंतर त्यांना तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू…