
डिंग्रजवाडी शाळेतील विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कु. ओंकार चंद्रकांत बांगर याची जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत निवड झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी ही माहिती दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ओंकारने चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वर्गशिक्षिका अनुराधा विजय…