शिरुरमधील कारेगाव येथे इन्स्टाग्रामवर मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

Swarajyatimesnews

अत्याचार करणाऱ्या विधी संघर्षित बालकास पोलीसांनी घेतले ताब्यात

दिनांक ९ मार्च – सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर ओळख आणि मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १६ वर्षीय विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता व ६ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास कारेगाव ता.शिरूर जि पुणे येथील मल्हार हिल्स येथे हा प्रकार घडला आहे .

अल्पवयीन मुलगा वय १६ वर्ष याने अल्पवयीन मुली सोबत इन्स्टाग्रामवर ओळख करून तीचेशी मैत्री केली व कारेगाव येथील त्याचे राहते घरी घेवुन जावुन मी तुझ्यावर खुप प्रेम करतोय, तु मला खुप आवडतेस असे म्हणुन जबरदस्तीने दोन वेळा शारीरीक संबंध केले. तसेच सदर गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याने घाबरलेल्या मुलीने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. पीडितेच्या कुटुंबीयांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेत या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आधिक तपास करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!