वाघोली ( ता.हवेली) महिलांनी आपल्यातील क्षमतांचा शोध घेऊन सक्षम करियर घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे. महिला ह्या कुटुंबांचा केंद्रबिंदू असून त्या कुटुंबाला एकत्रित गुंफण्याचे काम करत असतात.महिला ही कुटुंबात आई,बहिण, मुलगी ,पत्नी अशा नात्यांच्या भूमिकेतून जात असताना ती सर्व वेळी कुटुंबाच्या संसाराचा गडा अविरतपणे चालवता असते त्यामुळे तिच्या स्त्री सन्मानाची जबाबदारी ही प्रत्येकाने घेतली पाहिजे असे पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी डॉ.संगीता राजापुरकर यांनी बी जे एस कॉलेजमध्ये विशाखा समिती, माजी सैनिक कल्याण संघटना व रोटरी क्लब ऑफ खराडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बी जे एस प्रबंध समितीचे सदस्य सुरेश साळुंके, रोटरी क्लब खराडी येथील धान्या नारायण, माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनिल सातव,आनंद गोसावी, रोटरी क्लबच्या सदस्या मा. कर्नल प्रवीण कुमार, मिसेस शबाना खान आणि मा. निर्मला मॅडम उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड उपस्थित होते.
पुढे उपजिल्हाधिकारी राजापूरकर म्हणाल्या महिलांनी स्वतः सुदृढ राहून चांगल्या शिक्षणाकडे लक्ष देऊन आपल्या आवडी निवडीनुसार क्षेत्रात कार्य करून उत्तुंग भरारी घेतली पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून सुरेश साळुंके यांनी शांतीलालजी
मुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील चाळीस मुलींना इंजिनियर केले असून दोन मुली इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत तर गरीब महिलांना शिलाई व रोजगार देण्याचे काम बीजेएस संघटना विनामोबदला करते असे मत व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वीरपत्नी चित्रा दिलीप चौधरी, सुमन लीलाधर पाटील, भारती राजेश पिलावरे, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेविका यांच्यासह माजी सैनिक पत्नी महिला बचत गटातील स्त्रिया, महिला पोलिस कर्मचारी, बीजेएस प्रकल्पातील आरोग्य सेविका, वसतिगृहातील महिला, महाविद्यालयातील महिला, महिला कर्मचारी व विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब खराडी पुणे यांनी आर्थिक निधी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रुपाली गुलालकरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नम्रता पाचरणे व प्रा. रोहिणी शेवाळे यांनी तर आभार डॉ. माधुरी देशमुख यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रुपाली गुलालकरी, डॉ भूषण फडतरे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. भाग्यश्री जोशी, डॉ.सचिन कांबळे, गिरीश शहा, कुणाल वारुळे, नवनाथ बटुळे यांनी केले.