शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने किशोरवयीन मुलींना सायबर सुरक्षा आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन, सॅनिटरी नॅपकीन वाटप, सॅनिटरी नॅपकिन डिसपोजल मशीन व महिलांसाठी स्वच्छतागृह अशा उपक्रमांनी आदर्श महिला दीन साजरा
शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील आधुनिक युगात सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करून देणे तेथे त्यांना सुरक्षित वातावरण देणे ही समाजाची जबाबदारी असून स्त्रियांच्या सन्मानातच समाजाची प्रगती असल्याचे प्रतिपादन शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने विद्याधाम प्रशालेतील किशोरवयीन मुलींना सायबर सुरक्षा आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ६०० मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येऊन प्रशालेच्या स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन डिसपोजल मशीन बसवण्यात आले. तसेच, शिक्रापूर बाजारात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शौचालय बसवले गेले, ज्यामुळे रोजच्या आणि आठवड्याच्या बाजारातील सर्व महिलांना सुविधा मिळेल व स्वच्छतागृह उपलब्ध झाल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
या कार्यक्रम प्रसंगी शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी सर्व महिला सदस्य आणि कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावले मॅडम यांनी सायबर सुरक्षा विषयावर, तर ईरो हॉस्पिटलच्या डॉ. धुमाळ मॅडम यांनी आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच पुजा भुजबळ, सारिका सासवडे,मोहिनी मांढरे, उषा राऊत, वंदना भुजबळ शालन राऊत,विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक सोनबापू गदरे व यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद, तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश शेंडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सोनबापू गदरे यांनी, सूत्रसंचालन तोडकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन गावडे मॅडम यांनी केले