
बेघर वृद्धाला दिला मायेचा आधार: सरपंच रमेश गडदे आणि समस्या-उपाय ग्रुपचे माणुसकीचे दर्शन
शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसटी स्टँड परिसरात चार-पाच दिवसांपासून भटकणाऱ्या निराधार वृद्धाला शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपच्या सदस्यांनी आणि सरपंच रमेश गडदे यांनी मायेचा आधार दिला. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत असाहाय्य अवस्थेत असलेल्या या वृद्धाची विचारपूस केल्यानंतर त्यांना कुठलाही आधार नसल्याचे समोर आले.यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे व समस्या व उपाय ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाला सणसवाडी येथील माहेर…