कोरेगाव भीमा येथे लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार

Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) तरुणीची  अजय साळुंखे याच्या सोबत ओळख झाल्यानंतर अजयने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी  शारीरिक संबंध प्रस्तापित केले.

मात्र युवतीशी लग्न न करता गुपचूप दुसऱ्या युवतीशी लग्न केले. त्यांनतर पिडीत युवतीने त्याच्याशी भांडण करत पोलिसांत तक्रार देते असे म्हटल्यानंतर अजय याने युवतीला रांजणगाव गणपती येथे भेटायला बोलावले.

त्यानंतर त्याने युवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत पुन्हा युवतीला कोरेगाव भीमा येथील मित्राच्या रूमवर घेऊन जाऊन युवतीवर बलात्कार केला. याबाबत पिडीत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अजय कैलास साळुंखे रा. कोपरगाव ता. अहिल्यानगर जि. अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील महिला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करत आहेत.6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!