Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
धक्कादायक ! पेरणे फाट्यावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, कचरा टाकत नागरियांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पेरणे फाटा (ता. शिरूर) : येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला लागूनच असलेल्या दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका कचरा डेपोमध्ये बाहेरील कंपन्यांचा घातक रासायनिक आणि औद्योगिक कचरा बेकायदेशीरपणे आणून तो सर्रासपणे जाळला जात आहे. या कचऱ्यातून निघणाऱ्या प्रचंड विषारी धुरामुळे संपूर्ण परिसरात लोकांचा श्वास…
शिरूर तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा, पाबळ, कान्हूर मेसाई परिसरात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर
टँकरसाठी नागरिकांची कसरत गतवर्षी झालेला अल्प पाऊस, उन्हाच्या वाढत्या तीव्र झळा, आटलेले पाणवठे, ओढे-नाले आणि विहिरींनी गाठलेल्या तळा यामुळे शिरूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ परिसरातील गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवर सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी प्रशासन आणि…
धक्कादायक! तळेगाव ढमढेरे येथे मंदिरांसह घरे व किराणा मालाचे दुकान लुटले; ४ मास्कधारी चोरांचा थरार CCTV मध्ये कैद!
श्वान पथकाकडून चोरांचा माग सुरू; पोलिसांच्या ‘वचका’वर गावकऱ्यांचे गंभीर प्रश्नचिन्ह तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर): तालुक्यातील ऐतिहासिक आणि शांत मानल्या जाणाऱ्या तळेगाव ढमढेरे गावात काल रात्री चोरांनी उच्छाद मांडला. गावातील प्रसिद्ध शनी मंदिर आणि दत्त मंदिराच्या दानपेट्या फोडून दक्षिणेचे पैसे लंपास करण्यात आले, तर तीन बंद घरांसह एक किराणा मालाच्या दुकानाचे कुलूप तोडून धाडसी चोरी करण्यात…
Cockroach Janta Party ला पहिला मोठा धक्का; ‘X’ अकाउंट भारतात बॅन!
सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालणाऱ्या Cockroach Janta Party ‘कॉकरोच जनता पार्टी’ला मोठा धक्का बसला आहे. या पार्टीचे अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाउंट भारतात अचानक बंद (Ban) करण्यात आले आहे.गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांची तुलना कथितपणे ‘कॉकरोच’शी केल्याचा आरोप झाला होता. सरन्यायाधीशांनी यावर स्पष्टीकरण दिले असले, तरी तरुणांचा संताप शांत…
तुळापूर येथे शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये गाड्याच्या दोन बैलांसह घोडीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
शेतकरी पोपट शिवले यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; लाखोंचे नुकसान, शासकीय मदतीची जोरदार मागणी तुळापूर (ता. हवेली): तुळापूर परिसरामध्ये एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका प्रामाणिक शेतकऱ्याचा संपूर्ण गोठा जळून खाक झाला असून, गोठ्यात बांधलेल्या दोन उमद्या बैलांसह एका घोडीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला…
कमलेश आर्या ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. कमलेश आर्या यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. पुणे येथील एमईएस ऑडिटोरियममध्ये आयोजित सोहळ्यात ‘स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप’चे सीईओ निलेश साबे यांच्या हस्ते डॉ. आर्या यांना हा गौरव प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल सांसवडी व…
शाळांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार : विवेक वळसे पाटील
शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी शिक्रापूर येथील कोयाळी गावठाण आणि वाबळेवाडी शाळेला भेट देऊन तेथील अडचणींची पाहणी केली. शाळांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, शिक्रापूरचे प्रशासक रमेशर गडदे, ग्रामविकास…
तळेगाव ढमढेरे येथील गणेश नरके यांचा गायकवाड परिवाराच्या वतीने सत्कार
शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी श्री. गणेश नरके यांची पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी निवड झाल्याबद्दल शिक्रापूर येथे गायकवाड परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत आणि अथक परिश्रम घेत नरके यांनी हे यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. शिक्रापूरचे तंटामुक्त समितीचे…
विलास बत्ते यांची भाजप शिरूर बेट मंडल सरचिटणीसपदी निवड
रांजणगाव गणपती परिसरात कार्यकर्त्यांचा जल्लोष!रांजणगाव गणपती स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तर अंतर्गत शिरूर बेट मंडलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये भाजपचे सक्रीय कार्यकर्ते विलास रावसाहेब बत्ते यांची सरचिटणीस (महामंत्री) पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बेट मंडल परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून अभिनंदनाचा…
सलाम माणुसकीला! शिरूरमध्ये रस्त्यात प्रसूती होणाऱ्या महिलेसाठी डॉक्टर, नगरसेविका अन पत्रकार बनले देवदूत
शिरूर येथील जोशीवाडी परिसरातील एक गर्भवती महिला प्रसूती कळा सुरू झाल्याने आपल्या पतीसोबत ग्रामीण रुग्णालयाकडे पायी चालली होती. मात्र, निर्माण प्लाझा जवळ येताच तिला वेदना असह्य झाल्या आणि ती रस्त्यातच बसली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पत्रकार सुदर्शन दरेकर यांनी तत्काळ डॉ. संतोष पोटे यांना संपर्क साधला. काही वेळातच डॉ. सुनिता पोटे आणि नगरसेविका पूजा पोटावळे घटनास्थळी…
