Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
शिरूर तालुक्यातील वरुडे येथे घराबाहेर झोपलेल्या तरुणाचा मध्यरात्री गळा चिरून खून
शिरूर म टा वृत्तसेवा शिरुर तालुक्यातील वरुडे येथे मध्यरात्री एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरासमोरील कट्ट्यावर गाढ झोपेत असलेल्या बाळासो बबन तांबे (वय ४३) या तरुणाचा अज्ञात मारेकर्याने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली…
पत्रकाराला धमकी ! बातमी हटविण्यासाठी शिवीगाळ प्रकरणी ॲड विकास कुटेवर गुन्हा दाखल
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा सार्वजनिक हिताच्या विषयांवर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला धमकावून सोशल मीडियावरील बातम्या आणि डिजिटल पुरावे हटविण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिंदोडी (ता. शिरूर) येथील पत्रकार तथा शेतकरी तेजस रामदास फडके यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात रांजणगाव गणपती येथील विकास कुटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296,…
चासकमानचे पाणी तातडीने सोडणार, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यानंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन शिक्रापूर राजाराम गायकवाड चासकमान विभागाअंतर्गत येणाऱ्या कालवा क्रमांक ११, १२, १३ तसेच वेळ नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी तातडीने सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. १) चासकमान विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता धनंजय गावकर यांच्या कार्यालयात ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून ४ किंवा ५ जूनपर्यंत कोणत्याही…
धक्कादायक! पुणे-नगर हायवेवरील लॉजिंगमध्ये सेक्स रॅकेट उध्वस्त, ३ बांगलादेशी महिलांसह ७ जणींची सुटका!
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुणे-नगर हायवेवर कारेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका लॉजिंगवरील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस आणि दहशतवाद विरोधी शाखेने (ATS) संयुक्तपणे टाकलेल्या या धडक छाप्यात वेश्या व्यवसायातून तब्बल ७ महिलांची सुटका करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी ३ महिला या बांगलादेशी नागरिक असल्याचे…
पाबळ ग्रामीण रुग्णालयात महिनाभरात सर्व सुविधा उपलब्ध होणार; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एमपल्ले यांचे आश्वासन
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयातील बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही आणि बाळंत विभाग येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल. तसेच, पुढील एका महिन्यात शवविच्छेदन (Post-Mortem) सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांनी दिली आहे. पाबळ रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत डॉ. एमपल्ले यांनी शुक्रवारी (ता….
शिरूर तालुक्यात गोळीबार ! करडे घाटात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुण्यातील शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून झालेल्या भीषण गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. विशाल काळे असे मृत झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे….
पाबळ रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर, कुंपणच खातंय शेत, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ तर आरोग्यसेवा ‘रामभरोसे’!
जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या अचानक पाहणीत धक्कादायक वास्तव; डॉक्टर अनुपस्थित, रुग्णालयाची डी पी गायब, सरकारी खोल्या भाड्याने दिल्याने खळबळ स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्यसेवेचा प्रमुख आधार असलेले पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालय आज स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर आले आहे. ‘कुंपणच शेत खात असल्यासारखा’ धक्कादायक कारभार येथे सुरू असून, जबाबदार अधिकारीच…
विद्याधाम प्रशालेच्या १९८७ दहावी बॅचचा चौथा वर्धापन दिन ‘मोराची चिंचोली’ येथे उत्साहात साजरा!
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर येथील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या विद्याधाम प्रशालेच्या इयत्ता दहावी १९८७ बॅच परिवाराचा चौथा वर्धापन दिन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात साजरा झाला. २२ मे २०२२ रोजी या बॅचचे पहिले ऐतिहासिक ‘गेट-टुगेदर’ झाले होते, तेव्हापासून दरवर्षी हा परिवार आपला वर्धापन दिन एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेने साजरा करतो. या वर्षी या स्नेहसंमेलन…
रांजणगाव येथे बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेला १७ लाख ७६ हजारांचा गंडा
रांजणगाव पोलिसांकडून दोघांना अटक, १२ जणांवर गुन्हा दाखल रांजणगाव (ता.शिरूर): खरे सोने असल्याचे भासवून बँकेत बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेची तब्बल १७ लाख ७६ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव येथे उघडकीस आला आहे. बँकेच्याच अधिकृत सोने पारखणाऱ्याला (गोल्ड व्हॅल्यूअर) हाताशी धरून हा मोठा डल्ला मारण्यात आला असून, या प्रकरणी रांजणगाव…
पेरणे फाट्यावरील बेकायदेशीर कचरा डेपो तात्पुरता बंद; प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई
पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभालगतच्या दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कचरा डेपोप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेर गंभीर दखल घेत धडक कारवाई केली आहे. हवेली-खेड तालुका क्षेत्र अधिकारी रेखा तोगरे यांनी घटनास्थळी पाहणी करून भिमा नदीकिनारी कचरा टाकण्यास तात्काळ मज्जाव केला असून नागरिकांच्या आरोग्याला आणि भिमा नदीच्या स्वच्छतेला प्राधान्य देत…
