मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिक्रापूरच्या सुधीर मुळे यांचा ‘नियतीचे चक्र’ सन्मान

Swarajyatimesnews

स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा 

ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाची चळवळ उभी करून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे ASN कॉम्प्युटर एज्युकेशन, शिक्रापूरचे संचालक सुधीर व्यंकटराव मुळे यांना मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ सन्मान प्रदान करण्यात आला. मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला.

भारतीय जैन संघटना (BJS) आणि दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल मुळे यांची निवड करण्यात आली.

सन २००१ मध्ये स्थापन झालेल्या ASN कॉम्प्युटर एज्युकेशनने आजपर्यंत ३२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. MS-CIT, AI, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, टॅली, स्पोकन इंग्लिश आणि प्रोग्रामिंग यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम ग्रामीण भागात पोहोचविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

यापूर्वीही २०१६ मध्ये ‘डिजिटल इंडिया’ अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी आणि पालकांनी सुधीर मुळे यांचे अभिनंदन केले असून शिक्रापूर परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!